पाटण/प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील बेलवडे खु. गावामधे साकव पूलाचे काम गेली दोन वर्ष झाले सुरु असुन ते अद्याप रखडलेल्या आवस्थेत आहे. या पूलाचे काम त्वरित पूर्ण करावे तसेच इतके दिवस ते का रखडले आहे. याची माहिती मिळवी. अशी मागणी बेलवडे खु. गावातील ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षीण पाटण यांना केली आहे.
या निवेदनामध्ये असे म्हणले आहे कि, बेलवडे गावामध्ये मातंग वस्तीसाठी मंजूर झालेला साकव पूल जिथे मंजूर झालेला आहे तिथे न उभारता गावाबाहेर ओढ्यावरती उभारण्याचे काम सुरु आहे. सदर काम हे गेली दोन वर्ष झाले सुरु आहे. ते अद्याप पूर्णत्वास गेले नाही. एखाद्या कामाचा पूर्ण करण्याचा कालावधी कीती असू शकतो. यामागील पाठीमागचे गौडबंगाल आम्हाला कळावे. तसेच सा.बां. विभागाने आपला स्वतःचा व ठेकेदारांचा स्वार्थ साधण्यासाठीच या पूलाची निर्मिती केली होती काय? असे प्रश्न नागरिकांच्या मधून निर्माण झालेले आहेत.
लोकांच्या सेवेसाठी त्यांच्या गरजेची कामे झाली पाहिजेत परंतु हा साकव गेली दोन वर्ष का रखडवला आहे. हे नागरिकांना कळावे. त्याचबरोबर याचे अपूर्ण काम त्वरित सुरु करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. या निवेदनावरती सरपंच वंदना ज्ञानदेव सुतार, हणमंत पवार, पांडुरंग कांबळे, अधिक पवार, यशवंत कवर, दिनकर चव्हाण व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.