Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसमाज सेवा संघाने विद्यार्थ्यांचा केलेला सत्कार प्रेरणादायी : सत्यजितसिंह पाटणकर

समाज सेवा संघाने विद्यार्थ्यांचा केलेला सत्कार प्रेरणादायी : सत्यजितसिंह पाटणकर

पाटण, दि. 17 : विविध विषयांवर आधारीत ज्वलंत सजीव सामाजिक देखाव्यांच्या माध्यमातून समाज सेवा संघाने समाजात जनजागृतीचे काम केले आहे. आजपर्यंत संघाने राबविलेले उपक्रम तसेच विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पाठीवर दिलेली थाप विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस बळ देणारी आहे. संघाने विद्यार्थ्यांचा केलेला सत्कार इतर मंडळांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.

पाटण शहरातील समाज सेवा संघाच्या देखाव्याचे उद्‌घाटन आणि विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मुंबई क्राईम ब्रॅंचचे पोलीस निरीक्षक संजय निकम, दिलीपराव मोटे, र्धैयशील पाटणकर, पाटणच्या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, सौ. आयेशा सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, मन-मेंदू-मनगट हे ब्रीद वाक्य असलेल्या समाज सेवा संघाने खरोखरच कौतुकास्पद उपक्रम राबविले आहेत. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने संघाने प्रेरीत होवून यापुढेही समाजोपयोगी उपक्रम हाती घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थ्यांचा आणि गरीब परिस्थिती असतानाही शिक्षणाच्या जोरावर यशशिखर पादांक्रात केलेल्या युवकांचा सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. माजी सरपंच चंद्रकांत मोरे यांनी प्रास्ताविकात समाज सेवा संघाने आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. चंद्रहार निकम यांनी सुत्रसंचालन केले. समाज सेवा संघाचे अध्यक्ष गणेश मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास नगरसेवक सचिन कुंभार, विलासराव पवार, रफीक सय्यद, नितीन पिसाळ, पंडीतराव मोरे, सुरेश सकंपाळ, लक्ष्मण चव्हाण, नगरसेवक ऍड. सचिन देसाई, आनंदराव गुरव, यांच्यासह कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular