सातारा : श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड, ता. सातारा यांच्यावतीने श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फेरी काढण्यात आली. बुधवारी समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे छ. शिवाजी सर्कल पोवई नाका सातारा येथे मोठ्या उत्साहात सातारा शहराच्या प्रथम नागरीक नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, नगरसेविका सौ. स्नेहल नलवडे यांनी स्वागत केले.
यावेळी श्री राम जय राम जय जय रामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. समर्थांच्या पादुकांचा रथ पोवई नाक्यावरुन पुढे पोलीस मुख्यालय मार्गे शेटे चौक असा मार्गस्थ झाला. समर्थ पादुकांचा मुक्काम आज काळाराम मंदिरात असतो, सज्जनगड येथे दासनवमी उत्सव प्रतिवर्षी प्रमाणे याहीवषी विविध उपक्रमांनी साजरी होत आहे.
दरवर्षी श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांच्यावतीने समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचा प्रचार यात्रा रथाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात महिनाभर काढली जाते. भाविक भक्ती त्याचा लाभ मोठ्या प्रमाणे घेत असतात. समर्थ पादुकांचा दौरा यशस्वी पार पाडण्यासाठी रामदास स्वामी संस्थान सजजनगडचे प्रमुख भूषण स्वामी बाळासाहेब स्वामी व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.