सातारा : संभाजीनगर व खिंडवाडी ग्रा. पं. च्या एका जागेसाठी दुरंगी लढत होत असून विलासपूर ग्रा. पं. च्या एका जागेसाठी चौरंगी लढत होत आहे. खा. उदयनराजे भोसले गटाच्या समर्थकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर पोटनिवडणूकीच्या निमित्ताने समर्थकांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असून रात्री बैठका घेवून राजकीय रंगत या निवडणूकीत वाढु लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने पहिल्यांदाच विलासपूर पोटनिवडणूकीसाठी उमेदवार उभा केल्याने राजकीय रंगत वाढणार असे संकेत मिळू लागले आहेत.
संभाजीनगर मधील प्रभाग क्र. 3 साठी पोटणीवडणूक होत आहे. या ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने हेमलता भिंताडे, जयश्री माने, अशा जाधव, सुप्रिया घोलप, उमा धुमाळ, या पाच महिला उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते, मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात सुजाता घोलप यांनी साविआ मधून तर अलका विजय कुंजीर यांनी साविआ मधून आपला उमेदवारी अर्ज ठेवल्याने दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव कणसे व माजी उपसरपंच सतिश माने हे मामा भाचे जि. प. व पं. स. निवडणूकीपासून एकत्र आल्याने बारावकरनगर प्रभाग क्र. 3 मध्ये त्यांची ताकद वाढली आहे. कोडोली जि. प. गटातून निवडूण आलेल्या सदस्या अर्चना देशमुख व विद्यमान शंभाजीनगर उपसरपंच सुभाष मगर व अन्य काही ग्रा. पं. सदस्य एकत्र झाल्याने खा. उदयनराजे गटाची ताकद वाढल्याचा दावा समर्थक करु लागले आहेत. 914 मतदारामध्ये पुरुष 490 मतदार तर महिला 424 मतदार बारावकरनगरमध्ये कोणत्या उमेदवाराला पसंती देणार याची उत्सुकता मतदारामध्ये लागूण राहिली आहे. विशेष म्हणजे आ. शिवेंद्रराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे याचा अन्य नाराज एक गट कोणती भूमिका घेणार? यावरही बारावकरनगर मधील पोटनिवणूकीचे चित्र राहणार आहे. मात्र, सध्यातरी बैठकीना जोर आल्याने निवडणूकीचे वातावरण हळू हळू तापू लागले आहे. खा. उदयनराजे भोसले गटाचे संभाजीनगरमध्ये दोन्ही उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. विलासपूर महादेव वॉर्ड क्र. 2 मधून आ. शिवेंद्रराजे भोसले गटाकडून वैभव भोईटे, राजेश चव्हाण हे दोन उमेदवार पोटनिवडणूकीला सामोरे जात आहेत. वैभव भोईटे या निवडणुकीत बाजी मारणार असा दावा पं. स. सदस्य आशितोष चव्हाण यांनी केला आहे. तर आ. भोसले गटाच्या विरोधात खा. उदयनराजे भोसले गटाकडून राहूल पाटोळे तर प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रविण जाधव यांनी उमेदवारी भरुन पोटनिवडणूकीला सामोरे जात आहेत. या ठिकाणी चौरंगी लढत होत असून एकूण 791 मतदार कोणाला पसंती देणार याची उत्सुक्ता लागून आहे. आ. भोसले गटाकडून भोईटे व चव्हाण हे दोन उमेदवार असल्यामुळे मतांचे विभाजन होवून विरोधी उमेदवाराला त्याचा लाभ होईल का? याबाबतही राजकीय वर्तुळात तर्क विर्तक केले जात आहेत.
खिंडवाडी लक्ष्मीदेवी वॉर्ड क्र. 4 साठी अपक्ष म्हणून भारती गायकवाड तर गाव पॅनेल मधून सुरेखा कदम उभ्या आहेत. या दोघीमध्ये सरळ लढत होणार आहे. या ठिकाणीही पोटनिवडणूक बाबाराजे गट तर खा. उदयनराजे गटाने प्रतिष्ठेची केली आहे.
अल्का कुंजीर यांच्या प्रचाराचा शुभारंभ
संभाजीनगर वॉर्ड क्र. 3 च्या पोटनिवडणूकीसाठी ग्रामविकास पॅनेलमधून उभ्या असलेल्या सौ. अल्का विजय कुंजीर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक अॅड. डी. जी. बनकर, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, दादा तांगडे, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन शिंदे, माजी उपसरपंच सतिश माने, माजी पं. स. सदस्य आनंदराव कणसे, मोहनराव पोळ, ग्रा. प. सदस्य अमित पवार, सरपंच सौ. दिपाली पंडित व ग्रामस्थ उपस्थित होते.
अर्ज न आल्याने सहा ग्रामपंचायतीची राहिली रिक्त पदे
धोंडेवाडी, देशमुखनगर, लिंबाचीवाडी, जाधववाडी, टिटवेवाडी, चिंचणी पुर्नरवसीत या सहा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज एकही दाखल न झाल्याने रिक्तपदे राहिली आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली.