साताराः सातारा जिल्हातील तीर्थक्षेत्र दक्षिण काशी असलेल्या संगम माहुली या गावाला क वर्ग दर्जा आहे.संगम माहुली गावात छत्रपती घराण्यातील ऐतिहासिक समाधी स्थळे आहेत.तसेच 27 मोठया प्रमाणावर धार्मिक मंदिरे आहेत.तसेच कृष्णा- वेण्णा नदीचा संगम असून रोज संगम माहुली गावाला हजारो पर्यटक भेट देत असून संगम माहुली ग्रामपंचायतीला लोकांना चागली सेवा देण्यासाठी मोठया प्रमाणावर ग्रामपंचायतीचा निधी खर्च करावा लागतो.हा खर्च करण्यासाठी निधी कमी पडतो.तरी संगम माहुली ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी ग्रामस्थांचा व ग्रामपंचायतीचा प्रयत्न सुरु आहे.
रवीवारी चंद्रकांत(दादा) पाटील बांधकाम व महसूल मंत्री याना निवेदन देण्यात आले. त्यानी लवकरच संगम माहुलीला ब वर्ग दर्जा देण्या साठी प्रयत्न करू असे सांगितले. निवेदन देण्यासाठी भावी आमदार महेश शिंदे, कोरेगाव मतदार संघ व माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप (भाऊ) शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली व भा.ज.पा चे सातारा तालुका उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व माजी उपसरपंच अंकुश पडवळ, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बरकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विकास शिंद ह.भ.प.चे जगन्नाथ शिंदे, संगम माहूली गावातील प्रतिष्ठित शेतकरी दत्तानाना सुर्यवंशी, नरेंद्र सावंत, प्रकाश नेवशे, प्रविण शिंदे,उमेश पवार, स्वप्निल सुर्यवंशी, सुरज शिंदे, संजय शिंदे,धनंजय शिंदे, वैभव शिंदे, सुमित शिंदे., प्रदिप कदम, मंच्छिद्र कदम तसेच संगम माहूली ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ व संगम माहुली गावातील सर्व सार्वजनिक मंडळे यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
संगम माहुली तिर्थक्षेत्र दक्षिण काशीला ” ब ” वर्ग दर्जा मिळावा
RELATED ARTICLES