केळघर : वार्ताहर – मेढा, ता. जावळी येथील तहसील कार्यालयात महसूलदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात महसूल विभागातील कार्यरत असलेले निवासी नायब तहसीलदार संजय बैलकर यांना उत्कृष्ठ नायब तहसीलदार म्हणून गौरविण्यात आले.
नायब तहसीलदार संजय बैलकर यांनी जावली तालुक्यातील सन 2022-23 वर्षांमध्ये महसूल विभागामध्ये उल्लेखनिय कामकाज केल्याबददल महसूल दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे व तहसीलदार हणमंत कोळेकर यांचे हस्ते सत्कार करणेत आला, श्री . बैलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय , प्रांत कायालय सातारा, तहसिल कार्यालय पाटण येथे काम केले असून जावली तहसिलदार कार्यालय येथे दोन वर्षापासून कार्यरत आहेत .तसेच सातारा तालुक्यातील परळी मंडलामध्ये जास्तीत जास्त पानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेत रस्ते खुले करण्यासाठी प्रभावीपणे महसूली योजना राबविल्या तर पाटण तालुक्यातील अवैध्य व्यवसाय बंद करण्यासाठी धाडसीपणे काम करत सर्वसामान्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला . यासह इतर शासकीय केलेल्या कामकाजांची प्रशासनाने दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट नायब तहसीलदार हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले .
नुकत्याच झालेल्या महसूल दिनानिमित्त उत्कृष्ठ नायब तहसीलदार म्हणून त्यांना प्रांताधिकारी दादासाहेब दराडे ,तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शोभा भालेकर, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. महसूल विभागाकडून दर वर्षी उत्कृष्ष्ठ कामगिरी केलेल्या कर्मचारी , अधिकारी यांना प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येते. प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.