Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीसांस्कृतिक उपक्रमामुळे भागाचे वैभव वाढते : डॉ. श्रीपाल सबनीस

सांस्कृतिक उपक्रमामुळे भागाचे वैभव वाढते : डॉ. श्रीपाल सबनीस

वडूज: वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍यांना पुरस्कार देणे, साहित्य संमेलन भरविणे, पुस्तक प्रकाशन अश्या प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम राबविणे कौतुकास्पद आहे. असे उपक्रम ज्या भागात राबविले जातात त्या भागाचे वैभव वाढते. असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
वडूज येथील पंचरत्न मंगल कार्यालयात गुरसाळे (ता. खटाव) येथील शैक्षणिक, सामाजिक विकास संस्था व येरळा परिवार, शिक्षक व पत्रकार मित्र मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिडा पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, डॉ. बी. जे. काटकर, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे, प्राचार्य विजय कोकरे, शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ, कराड येथील बाजीराव पाटील, विजय लिगाडे, कवी बबन पोतदार, डॉ. विश्वास देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सबनीस म्हणाले, क्रिडा पुरस्कार दिल्यामुळे खेळाडूंचे मनोधैर्य वाढण्याबरोबर इतरांना प्रेरणा मिळणार आहे. डॉ. जाधव यांच्या पुस्तकामुळे दुष्काळी ग्रामीण भागातील साहित्यीक प्रगल्भता समोर आली आहे. श्री. गोडसे यांनी डॉ. जाधव यांनी मेडिकलचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचे आवाहन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मयुर जाधव यांनी लिहीलेल्या वास्तव विमर्श व वकृत्वाच्या वळणावर या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तर अ‍ॅथलेटिक्स श्‍वेता मोहन माळवे (तडवळे), मल्लखांबपट्टू आर्या जयवंतराव साळुंखे (सातारा), लांब उडी क्रीडा स्पर्धेतील यशस्वी प्रगती सुरेश जाधव (स्वरूपखानवाडी), रंजित चंद्रकांत पवार (कराड), साक्षी हरिदास बनसोडे (सिध्देश्‍वर कु), कुस्ती स्पर्धा विजेता अमोल शंकर नरळे (पानवन), कराटे पट्टू पृथ्वीराज शिंदे (वडूज) यांना जिल्हास्तरिय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविक केले. संयोजक आबासाहेब जाधव, शशिकला जाधव, धनंजय क्षीरसागर, भरत जाधव, प्रताप जाधव, बळीराम वाघ, मारूती जाधव, यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. कृष्णत जाधव, सुनील माने, अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास डॉ. शुभांगी काटकर, विजया बाबर, सोनाली विभुते, चंद्रकांत मोरे, उ.स.वाघमोडे, पृथ्वीराज गोडसे, कांतआण्णा फडतरे, आर्यन घाडगे, एस.आर.जाधव, युवराज घार्गे, श्री.शेजवळकर आदी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular