सातारा : रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांचे वतीने आपल्या उतुंग कर्तृत्वाने सातारा जिल्ह्याचे नाव उज्वल करणार्या व्यक्तीला प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. या उपक्रमाचे हे 28 वे वर्ष असून 2018 साठीचा हा पुरस्कार लोकप्रिय अशी 10 नाटके, 50 चित्रपट व अनेक महामालिकांचे लेखक करणारे प्रतीभावान साहित्यिक प्रताप गंगावणे यांना जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ बुधवार दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शाहूकला मंदीर येथे होणार आहे. रु. 25 हजार व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी तर्कतीथ लक्ष्मणशास्त्री जोशी, राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले, प्राचार्य शिवाजीराव भोसले, शाहीर साबळे, यमुनाबाई वाईकर, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर, बबनराव उथळे, सविता प्रभूणे, कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. नीलकंठ कल्याणी, ललिता बाबर, आदी महनीय व्यक्तींना या पुरस्काराने गौरविले गेले आहे. हा पुरस्कार समारंभ लोकप्रिय स्वराज्यरक्षक संभाजी सारख्या मालिका व नाटके व चित्रपटातील लोकप्रिय सुविद्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे हस्ते व श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पुरस्काराचे आकर्षक सन्मानचिन्ह प. ना. पोतदार व रविंद्र भारती या कलाकारांनी तयार केले असून त्यामध्ये ग्रामीण भागात शिक्षण घेवूनही आपल्या प्रज्ञेला परिश्रमपूर्वक बहुमुखी बनवून प्रतिभासंपन्नतेच्या बळावर अनेक लोकप्रिय नाटके, चित्रपट स्तंभलेखन व महामालिकांचे लेखन करारे प्रताप गंगावणे यांचा साताराभूषण पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात सातारकर नागरिक व रा. ना. गोडबोले ट्रस्ट ला धन्यता वाटते अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे. या आगळ्या कर्तृत्वगौरव समारंभास सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त अरुण गोडबोले, अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले, उदय गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले व डॉ. चैतन्य गोडबोले यांनी केले आहे.
सातारा भूषण प्रदान कार्यक्रम येत्या बुधवारी
RELATED ARTICLES