सातारा भूषण पुरस्कार हा प्रताप गंगावणे यांचेसाठी भविष्यातील पुरस्कारांची नांदी ः डॉ. अमोल कोल्हे.
सातारा : आज सर्वत्र चित्रपट, मालीका निर्मितीत लेखन करणार्या लेखकांना कमी लेखले जात असताना लेखनात उत्तुंग यश मिळवणार्या प्रताप गंगावणे यांना आज माझे हस्ते दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे भविष्यात मिळणार्या मोठ्या श्रेष्ठ पुरस्कारांची नांदी असेल असे उदगार लोकप्रिय स्वराज्यरक्षक संभाजी मालिका चे लोकप्रिय सुविद्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.
सातारा येथील शाहूकला मंदीर येथे रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांचे वतीने सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कोल्हे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी वरील उदगार काढले. या समारंभात श्री. छ. शिवाजीराजे भोसले हे अध्यक्ष होते तर याप्रसंंगी व्यासपीठावर ट्रस्टचे विश्वस्त अरुण गोडबोले, गंगावणे यांच्या पत्नी सौ. तेजश्री गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात प्रास्ताविक करताना ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अच्युत गोडबोले यांनी स्व. भाऊकाका गोडबोल यांच्या संकल्पेनेतुन सुर झालेला हा आमचा कुटुंबाचा ट्रस्ट वाढत आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने सातारा जिल्ह्याचे नाव उज्वल करणार्या व्यक्तीला ट्रस्टचे वतीने प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. या उपक्रमाचे हे 28 वे वर्ष असून आज हा पुरस्कार लोकप्रिय अशी 10 नाटके, 50 चित्रपट व अनेक महामालिकांचे लेखक करणारे प्रतीभावान साहित्यिक प्रताप गंगावणे यांना देताना ट्रस्टला विशेष आनंद होत असल्याचे सांगतिले.
आपले मनोगत व्यक्त करताना अरुण गोडबोल म्हणालेकी, प्रतापने आपल्या लेखणीतुन गारुड निर्माण केले. आज त्याला साहित्यिक म्हटले जात नाही हे दुर्देव आहे. साहित्य चळवळीचे नेतृत्व करणारांनी साहित्याचे निकष तपासून पहावेत व अंतर्मूख होउन विचार करावा. प्रतापच्या वास्तववादी, प्रतिभा संपन्न लेखनाचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा असे लेखन प्रताप गंगावणे यांनी केले आहे. आज त्यांच्या सत्कारास संभाजी मालिकेची सर्व टीम उपस्थित आहे हे त्याचे वरील प्रेम पाहताना त्यांना अशीच लेखनाची चांगली संधी निर्माण होवो व त्यांचे हातुन दर्जेदार लेखन होत रहावे अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या.
लेखक प्रताप गंगावणे यांना हा पुरस्कार प्रदान करताना रु.25 हजार, कंदी पेैढ्यांचा हार व सन्मानचिन्ह देऊन डॉ. कोल्हे यांनी गंगावणे यांना सन्मनित केले. यानंतर पुरस्काराचे साठी विशेष योगदान देणारे डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, बाळकृष्ण शिंदे, पुरस्काराचे आकर्षक सन्मानचिन्ह प. ना. पोतदार व रविंद्र भारती सौ. तेजश्री गंगावणे यांनाही गौरवण्यात आले. तसेच संभाजी मालिकेच्या टीमचे वतीने प्रताप गंगावणे यांना फेटा, तलवार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. अमेाल काल्हे यांनी आपल्या भाषणात प्रताप गंगावणे यांच्यामुळेच संभाजी महाराजांची मालीका गाजत आहे. त्याच्या आगळ्या वेगळ्या लेखनाच्या शैलीतून निर्माण होणारे कथेतील प्रसंग अतिशय दर्जेदार असून आज गंगावणे सरांच्या मुळेच हा पुरस्कार मला त्यांना देताना मी त्यांना सन्मानित नव्हे तर मी नतमस्तक होत आहे असे सांगतिले.
यावेळी संभाजी मालिकेतील दिग्दर्शक विवेक देशपांडे, राणूअक्का अश्विनी महांगडे, धाराउ लतिका सावंत, मोरेापंत नंदकुमार पाटील, कार्तिक केंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन प्रताप गंगावणे सरांच्या कसदार लेखनानेच ही मालिका आज सर्वत्र गाजत असल्याचे आवर्जून सांगितले.
सत्काराला उत्तर देताना हा पुरस्कार माझे साठी सरप्राईज आहे. मी आज कृतार्थं आहे. कारण आज माझ्या लेखनाला हे पुरस्काराचे स्वरुप प्राप्त झाले. मी अतिशय जिद्दीने जीवनात पुढे आलो यासाठी वडीलांकडून धाडस व झुंजण्याची तर आईने दिलेले रसाळतेचे धडे उपयोगी पडले. मी कोणतेच राजकराण कोणत्याच कलाकारासाठी केले नाही सरळपणे व प्रामाणिकपणे लिहीत राहीलेा यातुनच देश फिरलो. अनेक भाषा शिकलो त्याचा उपयोग मला लिहीताना झाला. आपल्या सवार्ंच्या पाठबळावर मी लिहीत राहीन त्यासाठी तुमच्या शुभेच्छा मला बळ देतील.
अध्यक्षीय भाषणात शिवाजीराजे भोसले यांनी प्रताप गंगावणे यांच्या लेखनाला भविष्यात अधिक यश मिळो, त्यांच्या हातुन अश्याच महनीय व दर्जेदार कलाकृती निर्माण हेावो अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या.
समारंभाचे सुत्रसंचलन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. समारंभास प्रताप गंगावणे यांच्या आई श्रीमती बहिणाबाई गंगावणे, पी. एन. जोशी, रमणलाल शहा, संभाजी मालिकेेचे सह निर्माते घन:श्याम राव, दिग्दर्शक विवेक देशपांडे,विलास सावंत रमेश राकडे, महेश काकेाटे, दादाजी सुर्वे नंदू पाटील, गणेश जाधव, अशोक गोडबोले, उदयन गोडबोले, अनुपमा गोडबेाले, संजीवनी गोडबोले, अविनाश लेवे, प्रदीप चव्हाण, नंदकिशोर नावंधर, गौतम भोसले यांचेसह कोरेगाव तालुक्यातील सोनके गावचे ग्रामस्थ व सतारकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लेखक प्रताप गंगावणे यांना सातारा भुषण पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES