Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातारा सर्किट हाऊसच्या दुरुस्ती ऐवजी रंगरंगोटी

सातारा सर्किट हाऊसच्या दुरुस्ती ऐवजी रंगरंगोटी

सातारा ( अजित जगताप ) :  सातारा जिल्ह्यातील प्रमुख शासकीय विश्रामगृह असलेल्या सातार्‍यातील सर्किट हाऊसची नेहमी प्रमाणे देखभाल केली जाते, पण सध्या निधी अभावी आता रंगरंगोटी करून घेतली जात आहे. त्यापेक्षा दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशी मागणी या ठिकाणी येणार्‍या लोकप्रतिनिधी व पर्यटकांनी केलीआहे.
स्व यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने सदर बझार येथील सैनिक स्कूल मैदान शेजारी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी सर्किट हाऊस बांधण्यात आले. या ठिकाणी तीन व्ही आय पी व सात कक्ष आणि एक व्यवस्थापक तसेच चार रूम आहेत. दोन मीटिंग रूम, भोजनगृह व मुबलक मोकळी जागा उपलब्ध आहे.याठिकाणी कर्मचारी वर्ग यांच्यासाठी निवासस्थान आहे.
दर वर्षी या ठिकाणी मुख्यमंत्री पासून ते नगरसेवक आणि सर्व शासकीय अधिकारी शासकीय दोरे असले की येतात. तर काही सामाजिक कार्यकर्ते हे तर दररोज देवळात जावे लागते तसे कमळ घेहून विश्रामगृहात दर्शनासाठी येतात. सत्ता प्रस्थापित झाली पण, कार्यालय नसल्याने अनेकांना विश्रामगृह म्हणजे कार्यालय बनवले आहे. त्यामुळे या विश्रामगृहात थांबणार्‍या काही अधिकारी वर्गाला ही धर्मशाळा भासत आहे.
येथील मुबलक पाणी पुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाक्या भरून वाहत असतात. हे पाणी गटारात सोडण्यात आले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने येथील भोजन ग्रहाची दुरुस्ती करावी यासाठी तीन दिवस भोजन ग्रह बंद करण्यात आले होते. पण, दुरुस्ती ऐवजी रंग रंगोटी होत आहे. आवश्यक ठिकाणी दुरुस्ती केल्यानंतर रंग देण्याची गरज आहे. तत्पूर्वी रंग कशाला?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही अधिकारी हे या विश्रामगृहात अनेकदा राहिले आहेत. काही संघटना पूर्व परवानगीशिवाय येथे बसतात. सभा घेतात. याबाबत सेवेत असलेल्या कर्मचारी वर्गाला जुमानत नाही. हे सुध्दा उघड झाले आहे. पाच वर्षपूर्वी येथील मोकळ्या जागेत सुसज्ज विश्रामगृह उभे राहिले अशी घोषणा राष्ट्रवादी व काँग्रेस नेते करीत होते. आता त्याची अंमलबजावणी होत नाही. मेडिकल कॉलेज सारखी अवस्था झाली आहे. दरम्यान, शासकीय विश्रामगृहाची चांगली देखभाल दुरुस्ती झालीच पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन ब्लु फॉर्सचे जिल्ह्यातील प्रमुख नेते मदन  खं काळ,सागर सावंत, बाबा ओव्हाळ, रमेश गायकवाड यांनी केली आहे.यासाठी बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे असे स्पष्ट केले आहे

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular