सातारा: आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट झाला आहे. प्रभाग क्र. 7 मध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष सहकार्यातून विविध विकासकामे राबवण्यास मी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या आणि श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागाचा आणि वार्डाचा सर्वांगिण विकास करणार आहे, असे प्रतिपादन नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक यांनी केले.
प्रभाग क्र. 7 मधील रविवार पेठ, पंताचा गोट, मल्हार पेठ आणि भोसले गल्लीत नेहमीच पावसाचे पाणी साचून गटारे तुंबली जात होती. त्यामुळे घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता.
हा प्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. नाईक यांनी दलीतवस्ती सुधारणा योजनेतून बंदीस्त गटारासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला.
या मंजूर कामाचा शुभारंभ सौ. नाईक यांच्या उपस्थितीत झाला. तसेच प्रभागातील पोलीस मुख्यालय ते बस स्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर ङ्गुटपाट बांधणे या कामासाठीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून डीपीडीसीच्या ङ्गंडातून 26 लाखाचा भरीव निधी उपलब्ध झाला असून हेही काम लवकर सुरु होणार असल्याचे सौ. नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी जितेंद्र माने, अंकुश इंगळे, विद्या भोसले, सविता भोसले, मनिषा भोसले, राधा भोसले, दीपाली नाईक, निर्मला भोसले, आशा तांबोळी, साधना भोसले, लक्ष्मी भोसले, अनुसया गुरव यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली वार्डाचा विकास करणार
RELATED ARTICLES