सातारा : 26 जानेवारी 2019 रोजी 70 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधून हेल्थकेअर सोल्युशन या संस्थेमार्फत जिल्हा बँकेने, बँक सेवक व कुटुंबियांकरिता सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले होते.सदर शिबिराचे उदघाटन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे हस्ते झाले.
सदर शिबिराचा उपयोग बँक सेवक व त्यांचे कुटुंबातील सदस्यांना होणार असलेचे डॉ. प्रदीप भोसले यांनी यावेळी सांगितले. तसेच कंपनी मार्फत इलेक्ट्रोनिक हेंल्थ कार्ड, घरपोच औषध सेवा, प्रयोग शाळेत न जाता रक्त तपासणी,तपासणीवर व औषधांवर सूट इत्यादी सेवा कंपनी मार्फत देणेत येणार असलेचे सांगितले.
यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेचे सर्वकष कामकाजाची नोंद देशाबाहेरही झालेली असून, बँकिंग कामकाजा व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीचे माध्यमातून बँक विकासाभिमुख कामकाज करीत आहे. बँकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत नैसर्गिक आपत्तीवेळी आर्थिक मदत तसेच रक्तदानाचे कॅम्प आयोजित केलेले आहेत.याचाच एक भाग म्हणून बँक सेवक व त्यांचे कुटुंबातील सदस्यांकरिता सर्वरोग निदान शिबीर आयोजित केले होते.
सदर शिबिराचा लाभ बँक सेवक व सेवकांचे कुटुंबातील सदस्यांनी घेतला असून यावेळी मोफत रक्त तपासणी तसेच टायटन आय पल्स मार्फत मोफत डोळे तपासणी करणेत आली. याप्रसंगी हेल्थकेअर सोल्युशन या संस्थेमार्फत डॉ. चैतन्य बोकील, डॉ.आदित्य महाजन, डॉ. अभिनेत्री खंडागळे, डॉ. देवयानी कोळी, डॉ. स्नेहल माने-जगताप, डॉ.स्नेहल पाटील, डॉ. पूजा भोसले, डॉ.श्वेता बढीया, डॉ. अमित चव्हाण, डॉ.प्रज्ञा साबळे, इत्यादी नामांकित डॉक्टरांकडून बँकेतील सेवक व सेवकांचे कुटुंबातील सदस्यांची मोफत तपासणी करणेत आली.
यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक एम. व्ही. जाधव, व्यवस्थापक आर. एस. गाढवे, श्री.राजेंद्र भिलारे, संजय इथापे , उपव्यवस्थापक, अधीक्षक, सेवक तसेच हेल्थकेअर सोल्युशन कंपनीचे समन्वयक राहुल माने उपस्थित होते.
सातारा जिल्हा बँकेत बँक सेवक व कुटुंबियांकरिता सर्वरोग निदान शिबिर उत्साहात
RELATED ARTICLES

