साताराः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि ., मुंबई यांचेवतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस कै. वैकुंठभाई मेहता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार सन 2016-2017 नुकताच मुंबई येथे मान्यवरांचे उपस्थितीमध्ये प्रदान करणेत आला.
सदर पुरस्कार महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचेहस्ते बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ऱाजेंद्र सरकाळे यांनी महा ऱाज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष हरिरिराव भोसीकर, सदस्य सुभाषराव जोशी, पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे, सातारा जिल्हा मध्य सह. संचालक प्रभाकर घार्गे (माजी आमदार) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये स्विकारला .
यावेळी बँक असोसिएशनचे अध्यक्ष शरद मैंद यांनी बँकेच्या कामकाजाची प्रशंसा केली व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सन 2016-2017 च्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर सदर पुरस्कार प्रदान केला असलेचे सांगितले . यापुर्वी सलग 3 वर्षे हा पुरस्कार बँकेस प्राप्त झाला असलेचे नमूद केले.
या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लािैककामध्ये आणखी भर पडली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या सातत्य व गुणवत्तापूर्वक कामकाजामुळेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबई यांनी सन 1997-1998 पासून बँकेस 16 वेळा संपुर्ण राज्यातून उत्कृष्ठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्काराने सन्मानीत केले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्यातून आलेले विविध सहकारी बँकांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते़
या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष आ. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक व विधान परिषद सभापती, ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष सुनिल माने, लक्ष्मणराव पाटील (माजी खासदार),आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, विलासराव पाटील (उंडाळकर) माजी सहकार मंत्री, विक्रमसिंह पाटणकर माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, प्रभाकर घार्गे (माजी आमदार) , दादाराजे खर्डेकर यांचेसह सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक एस एन. ज़ाधव, एम.व्ही. ज़ाधव, सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सेवक वर्ग, बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
कै. वैकुंठभाई मेहता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्काराने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सन्मानित
RELATED ARTICLES