सातारा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हयाच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाचे योगदान असून बँकेचे संस्थापक स्व़ यशवंतराव चव्हाणसाहेबांचा कृषि, ग्रामीण, सहकारी कार्यासाठीचा विचार या बँकेने रूजविला असून तीच यशस्वी परंपरा आजही अबाधित राहिली आहे़ बँकेचा कार्यलौकीक देशभर पसरला असून या कार्याचा थोर आदर्श अभिमानास्पद वाटतो, असे गौरवोद्गार ना. सुभाषराव देशमुख यांनी काढले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेवतीने केरळ पूरग्रस्तांसाठी 11 लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी ना. सुभाषराव देशमुख यांचेकडे सूपूर्त केला ़
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ़ राजेंंद्र सरकाळे म्हणाले, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती व बँकेचे संचालक ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरसाहेब यांचे नेतृत्व तसेच अध्यक्ष आ.श्रीमंत.छ़ शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन यामुळे सातारा जिल्हा बँकेचे कामकाज उल्लेखनिय आहे ़
सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासनेचे काम चांगल्याप्रकारे केले आहे. ना़ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व बँकेचे अध्यक्ष आ़ श्रीमंत छ ़ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केरळ पूरग्रस्तांकरिता बँकेमार्फत आर्थिक मदत जाहिर केली त्यानुसार ही मदत दिली असून या वर्षात यामध्ये माण, खटाव, कोरेगांव या अवर्षणप्रणव तालुक्यांमध्ये वॉटर कप फौंडेशनने सुरू केलेल्या कामास चालना मिळणेकरिता या तालुक्यातील गावांना रुपये 1 कोटी 60 हजारांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
मागील वर्षीही रुपये 50 लाखांची आर्थिक मदत, दुष्काळी भागातील द्राक्ष बागेसाठी पाणी पुरवठयासाठी कर्ज, ऊसावरील लोकरी मावा नियंत्रणासाठी आर्थिक सहाय्य, दुष्काळी भागातील जनावरांच्या छावणीसाठी अर्थ पुरवठा, नैसार्गिक आपत्ती तसेच कारगिल युध्दप्रसंगी जिल्हयातील शहीद जवानांचे कुटुंबियांना अर्थसहाय्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान कामगिरी केलेल्या जिल्हयातील खेळाडूंना अर्थसहाय्य, वृक्ष लागवड संवर्धनासाठी अर्थसहाय्य, मुंबई बॉम्बस्फोट दंगल प्रसंगी सातारा जिल्हयातील मृतांचे नातेवाईकांना अर्थसहाय्य तसेच ओरिसा वादळग्रस्तांना व गुजरात भुकंपग्रस्तांना अर्थसहाय्य, बँक सेवकांचे माध्यमातून वेळोवेळी रक्तदान शिबीरांचे आयोजन, टंचाईग्रस्त भागामध्ये पाणी पुरवठयाकरिता टाक्यांचे वितरण अशा विविध प्रकारे बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासलेली असलेचे सांगितले ़