Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसातारा शिक्षण विभागाचा खाजगी शाळांना दणका

सातारा शिक्षण विभागाचा खाजगी शाळांना दणका

 

सातारा :- सातारा जिल्ह्यातील पालकांना दिलासा देत सर्व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांनी दिनांक 27 एप्रिल 2021 पर्यंत मागील शैक्षणिक वर्षात किती शुल्क घेतले त्याचबरोबर त्याचे (bifurcation) कोणत्या सर्विस चे किती शुल्क घेतले तसेच पालकांना किती सवलत दिली, किती पालकांना दिली आणि त्याचे आधार अशी माहिती सादर करण्याचा आदेश दिल्याने शिक्षण क्षेत्रात मनमानी करणाऱ्या संस्थांना चाप बसणार आहे.

सातारा जिल्हा पालक संघाने पालकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठविताना मा. जिल्हाधिकारी यांना 22.03.2021 रोजी प्रत्यक्ष भेटून याबाबत लक्ष घालण्याचे विनंतीवजा लेखी पत्र दिले होते आणि त्याचा पाठपुरावा करत दि 30.03.2021 रोजी स्मरण पत्र दिले, त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील निवडक शाळा, शिक्षण विभाग आणि सातारा पालक संघ यांची संयुक्त बैठक घेतली. यामध्ये पालकांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या तक्रारींची गंभीरता लक्षात घेता मा. जिल्हाधिकांऱ्यानी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेत असलेल्या फी चा ब्रेक अप मागितला, परंतु कोणतीही शाळा तिथल्यातिथे फी चा ब्रेक अप देऊ शकली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात परत एकदा बैठक घेऊन याबाबत निर्णय घेऊ असे मा. जिल्हाधिकांऱ्यानी आदेश दिले.

मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव आणि लॉक डाऊन यामुळे दुसरी बैठक होऊ शकली नाही.

दरम्यान कही शाळांनी 10% सूट चे आमिष दाखवून पालकांची दिशाभूल करत पालकांना वेगवेगळ्या प्रकारे दबावाखाली ठेवत फी वसुली साठी जोरदार तगादा लावला, ऑनलाईन चालणाऱ्या लेक्चर मध्ये पालकांना व्हिडीओत बोलावून धमकावणे इथपर्यंत शाळांची मजल गेली.

सातारा जिल्हा पालक संघापर्यंत सदरच्या तक्रारी पोचताच तातडीने याबाबत दखल घेऊन शाळांचा दबाव झुगारण्यात आला.

तसेच पुन्हा एकदा मा. जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभाग यांचेकडे इमेल द्वारे दाद मागण्यात आली त्यामध्ये जिह्यातील सर्व खाजगी शाळांना यात सामावून घ्यावे अशी विनंती करण्यात आली.

त्या अनुषन्गाने मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सातारा शिक्षण विभागाने खाजगी शाळांना चाप लावत दि 27 एप्रिल 2021 पर्यंत फीचा ब्रेकअप ची माहिती सादर करण्याचे आदेश देताना गट शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा करावा असेही आदेशात नमूद केले.

2020-21 च्या फी मध्ये सरसकट दिलेली 10% सवलत नाकारत *जेवढी सर्विस तेवढी फी* यावर जिल्हा पालक संघ ठाम आहे

खाजगी शाळा पालकांवर दबाव आणत आहेत किंवा पुढील वर्षात प्रवेश देणार नाही, निकाल देणार नाहीत, नवीन वर्षाची फी भराविच लागेल अशा स्वरूपाचा दबाव पालकांवर टाकत आहेत अशा स्वरुपाच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

अजूनही बरेच पालक आपल्या पल्याला शाळा त्रास देईल म्हणून पुढे येऊन तक्रार देत नाहीत, अशा पालकांनी खालील लिंक वर क्लीक करून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात.

https://forms.gle/yFrLdtdQ21ApbQ7g8

सातारा जिल्हा पालक संघ
सातारा

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular