मेढा ( वार्ताहर ) सातारा मेढा रस्त्यावर रस्ता पॅचिंग करण्याचे काम सुरू असून यातुनच रस्ता मॅचिंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु झाला आहे.
सातारा मेढा रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या मार्गावरून ये जा करणारे प्रवाशी, दुचाकी स्वार, चारचाकी चालवणारे चालक मालक यांना त्रास सहन करावा लागत असून त्याचबरोबर प्रदुषण ही होत असलेने सर्व नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या खड्डयांमुळे कंबरदुखी, पाठदुखी आदी व्याधी निर्माण होत आहेत तसेच वाहन चालविणे अवघड बनले आहे. रस्त्याचे कामकाज दोन्ही बाजुंनी सुरु असून उर्वरीत रस्त्यातुन वाहन चालविताना जर समोरून वाहन आले तर दोन्ही वाहनांना काळजीपुर्वक रस्ता पार करावा लागत आहे. काही ठिकाणी वळण असल्याने रस्ता समजण अवघड बाब झाली आहे.
रस्त्यांवर धावणाऱ्या एस.टी. बसेस , माल वाहतुकीच्या मोठ मोठया गाडया, या सर्वानाच या भागातुन प्रवास करताना नाकी नऊ येत आहे. रस्त्याचे कामकाज कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्ता बनविताना मोठमोठी झाडे आडवी झालेली पाहताना नागरिकांचे मन मात्र बैचेन होत आहे.ब्रिटीशकालीन इतिहास या मुळे नक्कीच मागे राहणार असला तरी काहीतरी मिळवताना काही तरी गमवावे लागते याची जाणीव आता होवू लागली आहे.
( छायाचित्र .. अभिजीत शिंगटे )
रस्त्याला ” पॅचिंग करून रस्ता मॅचिंग ” करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू ; रस्त्यावरील प्रदुषणामुळे आरोग्य अडचणीत
RELATED ARTICLES