Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसातारा पालिकेने नविन आणलेल्या वाहनांचे पूजन व लोकार्पण

सातारा पालिकेने नविन आणलेल्या वाहनांचे पूजन व लोकार्पण

सातारा : कचरा ही सार्वत्रिक समस्या आहे. कचरा मुक्त शहर ही सातारकरांच्या हिताची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी, नगरपरिषदेच्या मागिल40-50 वर्षाच्या इतिहासात,  कधीही इतक्या मोठया प्रमाणात सातारा विकास आघाडीच्या माध्यमातुन नवीन वाहने  खरेदी करण्यात आलेली असून, या वाहनांचा कार्यक्षम वापर करुन, कचरा समस्यां उद्भवणार नाही याची काळजी घ्या अश्या आदेश वजा सूचना सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज नगरपरिषदेच्या अधिकारी आणि पदाधिका-यांना दिल्या.
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकरीता नगरपरिषदेने तयार केलेल्या आणि शासनाने मंजूर केलेल्या डि.पी.आर.(डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) नुसार दोन जेसीबी, दोन टिपर आणि एक ट्रॅक्टर, चार फॉगिंक मशिन, दोन ग्रास कटींग मशिन, जीईएम पोर्टलवरुन खरेदी करण्यात आले आहेत, त्याचा लोकार्पण आणि पूजन प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती सौ.स्नेहा नलवडे, मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापती सौ.संगिता आवळे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, यांचे सह नगरसेवक,नगरसेविका प्रमुख उपस्थित होते.
सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष आम्ही असलो तरी सातारा विकास आघाडी ही सर्व सातारकर नागरीकांची आहे. सातारकरांच्या हितासाठी जे करणे आवश्यक आहे ते ते आम्ही करण्यास कधीही मागे राहीलेलो नाही. सध्या कचरा ही समस्या सर्वच शहरांना भेडसावत आहे. सातारकरांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी, सातारा शहर हे कचरा मुक्त असावे अशी आमची धारणा आहे.
कचरा कुंडीमध्ये साठु नये म्हणून सर्वप्रथम सातारा विकास आघाडीनेच कुंडीमुक्त शहर संकल्पना राबविली आणि घरोघरी जावून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडयांचा उपक्रम राबविला तो पूर्ण यशस्वी ठरला. घंटागाडयांचा नगरपालिकेचा आदर्श पुढे अनेक शहरांनी घेतला.
आता घनकचरा व्यवस्थापनांतर्गात ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करुन, त्यावर कंपोस्ट डेपोवर  प्रक्रीया करुन, खतनिर्मिती करण्यात येणार आहे. खतनिर्मिती प्रकल्पाचे चार कोटींचे काम सुरु करण्यात आलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत कचरा योग्य वेळी उचलला जावा म्हणून यांत्रिकीकरणावर भर देत, आज एकूण 70 लाख रुपयांची वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत.या वाहनांचा आपत्कालिन परिस्थितीतही उपयोग केला जावू शकणार असून, कचरा साठु नये म्हणून आधुनिक पध्दतीची जोड देण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे.
या दोन जेसिबींचा आणि दोन डंपरचा चांगला आणि कार्यक्षमपणे उपयोग करुन, कचरा ही समस्या भविष्यात भेडसावणार नाही याची दक्षता आणि काळजी आता अधिका-यांनी आणि पदाधिका-यांनी घ्यावी अश्या आमच्या सूचना आहेत. स्वच्छतेकरीता आम्ही कोणतीही तडजोड स्विकारणार नाही अश्याही सूचना यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिल्या.
प्रथम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वाहनांचे पुजन केले. तसेच नव्याने घेतलेल्या टिपरच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, यशोधन नारकर यांना समवेत घेत,  टिपर स्वतः वाहन चालवून बघितले.
यावेळी अ‍ॅड.डि.जी.बनकर, माजी उपनगराध्यक्ष राजु भोसले, माजी आरोग्य सभापती (वसंतअण्णा) लेवे, बबलु साळुंखे, नगरसेविका लता पवार,सौ.सुमती खुटाळे, सुनिता पवार, सविताताई फाळके,सौ.स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडीक, निशांत पाटील, अल्लाउद्दीन शेख, किशोर शिंदे, ज्ञानेश्‍वर फरांदे, सौ.रजनी जेधे, सौ.सीता हादगे, सौ.अनीता घोरपडे, नगरपरिषदेचे अधिकारी विवेक जाधव, राजेंद्र कायगुडे, प्रविण यादव, जालिंदर रणदिवे, गणेश टोपे, सौरभ साळुंखे, राजेश भोसले, संदिप सावनूर, दत्ता जाधव, सोमनाथ वाघमारे, मयुर क्षिरसागर आदी मोठया संख्येने  उपस्थित होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular