Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमुख्याधिकारी शंकर गोरे यांना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची नोटीस 

मुख्याधिकारी शंकर गोरे यांना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची नोटीस 

सातारा :- सातारा नगरपालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नोटीस बजावली असून यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गणेशोत्सवाला कालावधी कमी राहिला आहे. त्यातच नगरपालिकेचा भोंगळ कारभार जगजाहीर आहे. अद्यापही गणेश विसर्जन मिरवणुक मार्ग व स्थळे निश्चित केली गेली नाहीत. त्यामुळे जनतेत संभ्रम, असंतोष व अनिश्चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुक मार्ग व स्थळे याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. न घेतल्यास निर्णयाची व्यापक प्रसिध्दी देऊन नागरिकांमधील संभ्रमावस्था दूर करावी. आपण तात्काळ निर्णय जाहीर केला नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी म्हणून जबाबदार धरले जाईल, अशी नोटीस सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बाजवल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular