सातारा :- सातारा नगरपरिषद अंतर्गत आरोग्य विभागात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत ठेकेदारी पध्दतीने जवळपास २०० महिला स्वच्छता कर्मचारी आहेत.सध्या जगामध्ये कोविड १९ या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे.हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.अशावेळी जीवाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी काम करत आहे.पालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा व वेळेवर पगार होतात.परंतु ठेकेदारी पध्दतीने काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.
त्यासाठी आज रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष मा.गणेश दुबळे सर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून मा.माधवीताई कदम,नगराध्यक्षा सातारा नगर परिषद यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या अडीअडचणी मांडल्या.
यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या.
१)ठेकेदारी पध्दतीने काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचे गेली ३ महिने थकीत असलेले पगार त्वरीत मिळावेत.
२)स्वच्छता कर्मचाऱ्यांचे PF कपात करावी व त्याची पावती मिळावी.
३)ठेका पध्दतीने काम करणाऱ्या महिलांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा करावेत अथवा चेकने पगार द्यावा.
४)कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे साडी,बूट,रेनकोट मिळावेत.
५)कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ५० लाखाचा विमा उतरविण्यात यावा.
यावेळी झालेल्या चर्चेवेळी मा.माधवी कदम,माजी नगराध्यक्ष राजू भोसले, लेखापाल हिम्मत पाटील, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे सर तसेच सुरेखा राज बडेकर, सावित्रीबाई वाघमारे, रेखा भोसले, सुगंधा गाडे,रत्ना सोनावले, हिराबाई पवार, अलका चव्हाण,सुमन गायकवाड विद्या अडागळे, हिराबाई पवार, जयश्री दाबाडे, संगीता चव्हाण,जयश्री सावंत,पल्लवी राजेंद्र खरात संगीता प्रकाश चव्हाण, लक्ष्मी सुरेश घाडगे जयश्री गोविंद दाभाडे आदी स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.