Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीविषय समित्यांच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया 7 जानेवारीपासून सुरु

विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया 7 जानेवारीपासून सुरु

सातारा : सातारा पालिकेच्या दैनंदिन कामकाजाचा गाडा हाकणार्‍या विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया 7 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होत आहे. प्रांत कार्यालयाने हा निवड कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. या आदेशाची प्रत सायंकाळी पालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर सातारा शहरात प्रचाराची कमानं सांभाळणारे शिलेदार निवडताना सत्ताधारी सातारा विकास आघाडीला फार काळजीपूर्वक विचार करावा लागणार. सातारा पालिकेतील सहा विषय समित्यांच्या मुदती 6 जानेवारी 2018 रोजी संपत आहे. पालिकेच्या दैनंदिन कामकाजात विषय समिती आणि सभापती यांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे या विषय समित्यांवर वर्णी लागण्यासाठी सातारा विकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या विषय समित्यांच्या निवडींना महत्व असून आघाडीच्या कारभाराचा पालिकेत एक खांबी तंबू उभारण्यासाठी अनुभवी व अननुभवी यांची योग्य सांगड खासदार उदयनराजे भोसले यांना घालावी लागणार आहे. नगरसेवक किशोर शिंदे यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी चर्चिले जात आहे. आघाडीत संवादाचा राजकीय सुवर्णमध्य साधण्यासाठी उदयनराजेंना जवाबदार आणि चतुर चेहर्‍याची आवश्यकता आहे.
एकीकडे या राजकीय हालचाली सुरू असताना दुसरीकडे आगामी विषय समित्यांच्या निवडीसाठी प्रशासन तयारीला लागले आहे. प्रांत स्वाती देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उपनगराध्यक्षांसह पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम, नियोजन, व महिला बालकल्याणं या पाच समित्यांचे सभापती निवडले जाणार आहे. प्रांत कार्यालयाकडून हा निवड कार्यक्रम मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांना कळवण्यात आला असून तशा लेखी सूचनाही प्रांत स्वाती देशमुख यांच्या आदेशाने देण्यात आल्या आहेत.
सभापती निवडीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी 11.15 वाजता विषय समित्यांचा तपशील नगरसेवकांना सांगणे, 11.30 वाजता उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, दुपारी 12 वाजता प्राप्त अर्जाची छाननी, दुपारी 12.30 वाजता पसंतीक्रमानुसार गुप्त मतदान पध्दती राबवणे, 12.45 ते 1.45 नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, 1.45 वाजता अर्ज छाननी, दुपारी 2 पर्यंत अर्ज माघारी घेणे, दुपारी 2.15 नंतर सभापती निवडी जाहीर करणे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular