Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीरविवारी सातारा येथे राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन

रविवारी सातारा येथे राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन

सातारा : ज्योतिषशास्त्राचा शास्त्रशुद्ध प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने विविध ज्योतिष संस्थांच्या विद्यमाने राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन रविवार, दि. 28 एप्रिल 2019 रोजी शाहू कलामंदिर, सातारा येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित केले आहे. ं
या अधिवेशनाला पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, ठाणे, कल्याण अशा विविध ठिकाणांहून ज्योतिष अभ्यासकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन अनेक ख्यातनाम मान्यवरांच्या हस्ते होणार आहे व या अधिवेशनात अनेक व्यासंगी ज्योतिषांची व्याख्याने आयोजित केली आहेत.
दि. 28 रोजी अधिवेशनास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना अधिवेशन स्थळी 200/- रुपये शुल्क भरून प्रवेश मिळेल. प्रवेश शुल्कामध्ये चहा, नाश्ता, भोजन व टाचण फाईल दिली जाईल. तरी या अधिवेशनाचा सातारा जिल्हा व शहर परिसरातील जास्तीत जास्त ज्योतिष अभ्यासकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य रमणलाल शहा यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular