Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातारा रेस्ट हाऊस कर्मचारी विजय बोबडे यांचा नेत्यांसह अधिकाऱ्यांनी केला सत्कार  

सातारा रेस्ट हाऊस कर्मचारी विजय बोबडे यांचा नेत्यांसह अधिकाऱ्यांनी केला सत्कार  

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणाचा महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या  सार्वजनिक बांधकाम विभागात (सर्किट हाऊस) तथा सातारा विश्रामगृह येथे कार्यरत असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व कर्मचारी विजय बोबडे दि.३१  मे रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाले. निवृत्त दिनी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय बोबडे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या आज पर्यंतच्या प्रामाणिकपणे केलेल्या सेवेबद्दल कौतुक करुन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.                               सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने  सहाय्यक कार्यकारी अभियंता मा. श्री.अहिरे  यांचे हस्ते सेवानिवृत्ती बदल यथोचित सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या नियमांचे पालन करून छोटेखानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शाखा अभियंता श्री.आंबेकरी, श्री.तवले व कर्मचारी व राजू जेधे, पाटील, भोसले व मित्र उपस्थित होते.

विजय बोबडे यांच्या निवृत्त दिनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ना.शंभूराज देसाई, खा.उदयनराजे भोसले, खा.रणजितसिंह ना.निंबाळकर, खा.श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, आ.मकरंद पाटील, आ.दीपक चव्हाण, आ. शशिकांत शिंदे यांनी देखील बोबडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजय बोबडे यांनी आपल्या ३७ वर्षाच्या सेवेत अनेक राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकारी यांना सर्किट हाऊस येथे उत्तम सेवा दिली. इतक्या वर्षाच्या सेवेत एका ही राजकीय नेत्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी बोबडे यांच्या कार्याबद्दल तक्रार केली नाही. मनमिळावू अन् कार्यात तत्पर असा स्वभाव असलेले बोबडे यांचा प्रसिध्दी माध्यमांशी देखील तितकाच सातत्याने संपर्क आला. त्यांना तसेच सातारा जिल्ह्यातील काना कोपऱ्यातील व्यक्ती रात्री अपरात्री साताऱ्यात अडचणीत असेल तर त्यांना मदत आणि रेस्ट हाऊस येथे राहण्याची त्यांनी सातत्याने व्यवस्था केल्याचे आज पर्यंत दिसून आले.

दरम्यान, विजय बोबडे यांचा साताऱ्यात देखील मोठा मित्र परिवार आहे. बोबडे यांच्या निवृत्ती दिनी भावना व्यक्त करताना मित्र राजू जेधे व सहकारी म्हणाले, परक्यानाही आपलंसं करून घेणारा, सर्वांना हवाहवासा वाटणारा, आमच्याशी विद्यालयीन काळापासून जवळजवळ ४० ते ४५ वर्षांपेक्षा जास्त काळ एकरुप राहून आमच्या सुख-दु:खात  सहभागी होणारा आमच्या सर्वांच्या गळ्यातील ताईत, अजातशत्रू लाडका मित्र,विजय बोबडे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवावृत्त होतं आहे. प्रिय विजय यांचे सेवा निवृत्ती बदल सर्व मित्र मंडळ (old is Gold Group) चे वतीने अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

खरे तर, फलटण तालुक्यातील तडवळे या छोट्या खेड्यातून ४० वर्षा पूर्वी शिक्षणासाठी सातारा येथे आलेला हा अवलिया स्पष्ट रोखठोक व खेळकर स्वभावामुळे सर्वांना हवाहवासा वाटू लागला.धाडशीवृती व सर्वांसाठी झटणाऱ्या स्वभावामुळे साता-यात अनेक मित्रांना आपलं स करण्यात आघाडीवर राहिला. प्रत्येक क्षेत्रात तो आमच्या सर्वांच्या बरोबर राहिला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेत रुजू झाला. सर्वांना सहकार्य करणं हा त्यांचा सेवाभाव जन्मताच अंगी असलेने शासकीय सेवेत ही या चांगूलपणामूळे संपूर्ण ३७ वर्षांची प्रदिर्घ सेवा सर्किट हाऊस येथे एकाच ठिकाणी नि:कलंक पणे बजावून चांगला आदर्श निर्माण केला. ३७ वर्षाच्या कालावधीत अनेक मंत्री, आमदार, खासदार, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी व मान्यवर याची सेवा करणेचा योग व सहवास विजय बोबडे यांस लाभला. महाराष्ट्र राज्य, विधान सभेचे माजी सभापती, स्व.शंकरराव जगताप व विजय यांच्या मध्ये असलेलें विश्वास व प्रेमाचं नातं  होते ते सर्वांना ज्ञात आहेच.देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्री मंडळातील सद्यस्य, लेखक, पत्रकार यांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular