साताराः रविवार दि. 2 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व स्वयंसेवकांसाठी नुकतेच सातारा सिटी बिझनेस सेंटर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये मॅरेथॉनदरम्यान स्पर्धकांना येर्णाया वेगवेगळया आरोग्यविषयक समस्यांची माहिती डॉ. प्रतापराव गोळे यांनी स्वयंसेवकांना दिली. जवळजवळ साडे सहा हजार स्पर्धक यावर्षी ही मॅरेथॉन पळणार आहेत. स्पर्धा हिल मॅरेथॉन असल्यामुळे अवघड मानली जाते. 21.1 किलोमीटर अंतर पार करत असताना स्पर्धकांना शरीरातील वेगवेगळया बदलांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने शरीरातील पाणी कमी होणे, सोडीयम (मिठाची) माञा कमी किंवा जास्त होणे, शरीरातील पाणी, सोडीयम व मॅग्नेशियम या घटकांच्या कमतरतेमुळे पायांना क्रँम्स येणे, एखादा स्नायु किंवा सांधा धावताना दुखावणे अशावेळी स्वयंसेवकांनी दिलेल्या मार्गदर्शन व मदतीच्या साहाय्याने स्पर्धक स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण करू शकतो अशी माहिती देण्यात आली.
मॅरेथॉन दरम्यान होर्णाया हृदयविकाराची भीती सर्वांनाच वाटते परंतु हृदयविकाराने मॅरेथॉनमध्ये ञास होण्याची शक्यता लाखात एखादयास असते पुर्व परिक्षण, डॉक्टरांचा सल्ला व नियमित सरावाने या गोष्टींवर मात करता येते परंतु अशा प्रकारच्या ञास झाल्यास करावयाच्या जीवन संजीवन प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सर्व स्वयंसेवकांना देण्यात आले.
सातारा हिल भुलतज्ञ संघटनेच्या वतीने डॉ. अविनाश भोसले, डॉ.वैशाली मोरे व डॉ. परिमल यवतकर यांनी जीवन संजीवनी प्रक्रियेची सर्व तपशीलवार माहिती व्याख्यानाद्वारे स्वयंसेवकांना दिली. जीवन संजीवनी प्रक्रिया ही शिकण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पाळणे गरजेचे असते. प्रक्रिया करर्णाया स्वयंसेवकाने या गोष्टींचे पालन केल्यास हृदय बंद पडलेल्या व्यक्तीस आपण जीवनदान देवू शकतो या प्रक्रियेसाठी कोणत्याही महागडया वैदयकीय उपकरणांची गरज नसून केवळ आपल्या दोन हातांच्या योग्य वापराने आपण जीवनदान देवु शकतो अशी माहिती डॉ अविनाश भोसले यांनी दिली. जीवन संजीवनी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळण्यासाठी कृञिम मानव प्रारूपाची व्यवस्था(मॅनीकीन) करण्यात आली होती. प्रत्यक्ष मानवाप्रमाणेच आकार व संरचना असर्णाया या प्रारूपांचे आयोजन जिल्हा भुलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ वारूंजीकर मॅडम व डॉ लिमये मॅडम यांच्यातर्फे करण्यात आली होती प्रशिक्षणादरम्यान त्यांनी मार्गदर्शन केले.
एखादया व्यक्तीचे हृदय बंद पडल्यावर त्याच्या हृदयाच्या आलेखाचे परीक्षण करून गरजेचे असल्यास व्यक्तीस शॉक देणे गरजेचे असते. अलीकडे असे शॉक देण्याचे अत्याधुनिक व स्वयंचलित उपकरण उपलब्ध झाले असून याव्द्ारे हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीस शॉक देणे सोपे झाले आहे. या मशीन ए.ई.डी. या नावाने वेगवेगळया पब्लिक प्लेसेस (सार्वजनिक ठिकाणी) उपलब्ध करण्यात आल्या असून शॉक देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर केल्याने रूग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.
इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर या देशपातळीवर मान्यता पावलेल्या अतिगंभीर रूग्णांची सेवा करर्णाया अतिविशिष्ठ तज्ञ डॉक्टरांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. या सोसायटीच्या डॉ. स्वाती शेंडगे या तज्ञ डॉक्टर व त्यांच्या प्रशिक्षण देर्णाया टिमने शॉक देण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन व्याख्यान व प्रात्यक्षिक या स्वरूपात स्वयंसेवकांना दिले.
या प्रशिक्षण शिबीरामध्ये प्रतिभा हार्टकेअर सेंटर, मिनाक्षी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कनिष्का हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेजच्या डॉक्टर व परिचारीकांनी भाग घेतला व व्याख्यान तसेच प्रात्यक्षिकांचा सराव केला. त्याबरोबरच पोदार इंटरनॅशलन स्कूल, महाराजा ग्रुप, एस.सी.एम.एस. ग्रुप यांनीही या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. ढाणे क्लासेसचे विदयार्थी गेल्या तीन वर्षापासून मॅरेथॉनच्या फिनीश लाईन जवळ स्पर्धकांची विशेष काळजी घेण्याची मोठी जबाबदारी स्वयंसेवकाच्या माध्यमातुन पार पाडत असतात. या सर्वांची या शिबिराला उपस्थिती होती. प्रत्यक्ष वैदयकीय पेशाशी निगडीत नसलेल्या परंतु एखादयाचे प्राण वाचविंण्यासाठी धडपडर्णाया या सर्वांनी या प्रात्यक्षिकाचा फायदा घेतला. मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना कसे, किती, कुठे धावायचे याचे मार्गदर्शन करणारा पेसर्स ग्रुप ही सातारा हिल मॅरेथॉनची वैशिष्टपुर्ण ओळख आहे. या सर्व टिम मेंबर्सनी या जीवन संजीवनी प्रक्रियेची माहिती घेवून प्रात्यक्षिकात भाग घेतला. स्पर्धकांची आम्ही आता विशेष काळजी घेवू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मॅरेथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त असतो या पोलिस बांधवांना जीवन संजीवनी प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंञित करण्यात आले होते. याबाबतचे आदेश माननीय पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले होते या सर्व पोलिसांनी जीवन संजीवनी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असून मॅरेथॉन स्पर्धेेच्यावेळीच नव्हे तर इतर वेळीही आम्ही आता लोकांची मदत अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो अशा भावना व्यक्त केल्या.
प्रशिक्षण शिबीरास सहाय्य केलेल्या संघटनेच्या प्रतिनिधी डॉ. स्वाती शेंडगे व डॉ. अनुराधा वारूंजीकर यांचा सत्कार सातारा रनर्स फौंडेशनचे अध्यक्ष श्री सुजित जगधने यांच्यातर्फे करण्यात आला. या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनासाठी अॅड. कमलेश पिसाळ व प्रफुल्ल पंडीत, दिनेश उधानी यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रशिक्षण शिबिरास डॉ. संदीप काटे, डॉ सुचिञा काटे, डॉ.रंजिता गोळे, डॉ.पल्लवी पिसाळ, डॉ. आश्विनी देव, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. अदिती घोरपडे, अभिषेक भंडारी, डॉ.कविता बनकर, सुधीर शिंदे, डॉ. पौर्णिमा फडतरे, डॉ.दिपक बनकर, निशांत गवळी व मंगेश वाडेकर तसेच कनहय्या राजपुरोहित व इतर सदस्य उपस्थित होते मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान वेगवेगळया ठिकाणची मदत केंद्रे सांभाळर्णाया सर्वच सदस्यांनी शिबिरादरम्यान प्रशिक्षण घेतले.
सातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न
RELATED ARTICLES