Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपुलवामाच्या घटनेने हारतुरे स्विकारणार नाही: एसपी श्रीमती सातपुते

पुलवामाच्या घटनेने हारतुरे स्विकारणार नाही: एसपी श्रीमती सातपुते

सातारा : पुणे येथील वहातुक उपायुक्त पदावरून सातारच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झालेल्या श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी आज सायंकाळी 7 वाजता पोलीस मुख्यालयात मावळते पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याकडून सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा पद्_भार स्विकारला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुलवामाच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर हारतुरे स्विकारणार असे नम्रपणे सांगितले.
सात महिन्याच्या कालावधीत मावळते पोलीस अधिक्षक पकंज देशमुख यांची सातार्‍यातून पुणे वहातुक शहर शाखेत उपायुक्तपदी बदली झाली. तडका फडकी बदली झाल्याचा पडसाद राज्याच्या विधीमंडळात उमटले. सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक देशमुख यांच्या सात महिन्याच्या बदलीबाबत मंत्री महोदयांनी उत्तरे द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व कोरेगाव-खटावचे आ. शशिकांत शिंदे यांनी सभागृह कामकाजावेळी केली. सातारा जिल्ह्यात अशा पध्दतीने अधिकारी वर्गाची यापुर्वी बदली झाली नव्हती. पण केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून अधिकार्‍यांच्या बदलीची लाट आली आहे. याबाबत त्यांनी जाब विचारला. बुधवार दि. 27 रोजी सायंकाळी 7 वाजता सातारा जिल्हा नुतन पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी मुख्यालयात पाऊल टाकताच सर्व प्रथम पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना सॅल्यूट केला. त्यानंतर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना त्यांना जिल्ह्याचा पद्भार सपूर्द केला. सात महिन्यात बदली झाल्याने देशमुख यांनी पुण्याचा पद्भार स्विकारण्यासाठी रवाना झाले. सात महिन्यात केलेल्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले. यानंतर पोलीस अधिक्षक पदाच्या खुर्चीवर श्रीमती सातपुते विराजमान झाल्यानंतर पर्यवेक्षण आयपीएस अधिकारी समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. नि. विजय कुंभार यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular