साताराः फ्रेंड्स फॉरेवर या नाटकाचा प्रयोग सातारकर नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला अशी माहिती जागृती कलामंचचे अध्यक्ष महेश गुरव यांनी दिली. या नाटकाचा प्रयोग रविवारी शाहू कला मंदिरमध्ये आयोजित करण्यात आला होता. नाटकाचे उदघाटन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवराम माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ पत्रकार विजय मांडके, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे प्रमुख समन्वयक प्रा. ए.पी .देसाई, संगीत विशारद बाळासाहेब चव्हाण, जेष्ठ रंगकर्मी श्रीकांत के टी , बाळासाहेब शिंदे, मकरंद गोसावी प्रमुख उपस्थित होते.
महेश गुरव म्हणाले, फ्रेंड्स फॉरेवर नाटकाची निर्मिती जागृती कलामंच, कुसवडे यांनी केली आहे. या नाटकात कुसवडे गावातील कलाकारांनी अभिनय केला आहे. या नाटकाचे लेखन विक्रम बल्लाळ यांनी केले असून दिगर्द्शन मारुती जगताप यांनी केले आहे. या नाटकात आई नसलेल्या मुलीची कथा मांडण्यात आली आहे. ज्या मुली बिना आईच्या असतात त्यांना संस्कार नसतात असा समज लोकांचा असतो हाच गैरसमज खोडून काढण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे. एक खोट बोललं कि ते लपवण्यासाठी पुन्हा वारंवार खोट बोलायला लागत हेही या नाटकातून मांडलं आहे.
नाटक यशस्वी होण्यासाठी रामचंद्र यादव, आकाश दळवी, सुशील बल्लाळ, विकास बल्लाळ,समाधान दळवी , समाधान बल्लाळ, प्रमोद कांबळे,अक्षय कारबळ, संकेत माने, शुभम ढाले, सुजित कदम,श्रीजय कदम यांनी परिश्रम घेतले.
फ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES