म्हसवडः म्हसवड गाव सातबारा संगणकीरणासाठी विशेष बाब म्हणून पूर्वी प्रमाणेच इडिट सुविधा मिळून खातेदारांना न्याय देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर यांनी नामदार चंद्रकांत पाटील यांचेकडे केली आहे .
राज्याचे महसूलमंत्री नामदार चंद्रकांत पाटील दुष्काळी दौर्यानिमित्त म्हसवड जनावर छावणीवर आले असता प्रा. विश्वंभर बाबर यांनी निवेदनाद्वारे वरील मागणी केली . म्हसवड हे नगरपालिकेचे गाव असून एकूण 11800 सर्व्हे नंबर आहेत . म्हसवड गावचे संगणीकरण खूपच कमी झाले असताना देखील संगणीकरणाचे काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले आहे . प्रत्यक्षात चार हजार सर्व्हे नंबर इडिट झालेले नाहीत म्हणजेच त्यांचे संगणीकरण बाकी आहे .याप्रकरणी डी -1 चे काम पूर्ण झाले असे जाहीर करून डी-2 चे काम न करताच प्रत्यक्षात डी-3 जाहीर केले आहे . म्हणजे संपूर्ण सातबारा संगणीकरणाचे काम अपूर्ण असताना काम पूर्ण झाल्याचे दाखिवले असल्याचे प्रा. बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे .
निवेदनात पुढे म्हणाले आहे की म्हसवड शहर व वाडीवस्ती वरील सातबारा संगणीकरणाचे काम पूर्ण नसल्यामुळे स्थानिक तलाठी स्तरावर दुरुस्ती होत नाही त्यामुळे खातेदार व शेतकर्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .यामध्ये खातेदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असून शासकीय स्तरावर हेलपाटे मारावे लागत आहेत . विशेष बाब म्हणून म्हसवड गावासाठी इडीट सुविधा देण्याची मागणी प्रा. बाबर यांनी ना.चंद्रकांत पाटील यांचेकडे केली आहे .या बरोबरच पुणे विभागीय महसूल आयुक्त दीपक म्हैसेकर दुष्काळी आढावा बैठकीनिमित्त दहिवडी येथे आले असता त्यांनाही प्रा. विश्वंभर बाबर यांनी मागणीचे निवेदन दिले आहे .
म्हसवड गाव सातबारा इडिट सुविधा मिळावी : प्रा. विश्वंभर बाबर
RELATED ARTICLES

