Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडून कोविड सेंटरच्या २५ ऑक्सिजन सिलेंडरसाठी १ लाख २५ हजार...

सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडून कोविड सेंटरच्या २५ ऑक्सिजन सिलेंडरसाठी १ लाख २५ हजार रुपयांची मदत.

पाटण:- पाटण तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावू नये म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांनी गतवर्षी पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरला नवीन बेडसह २५ ऑक्सिजन सिलेंडर दिले होते. यावर्षीही रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने सत्यजितसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून पुन्हा कोरोना केअर सेंटरला २५ ऑक्सिजन सिलेंडरसाठी १ लाख २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

गतवर्षी पाटण तालुक्यात कोरोनाने कहर केला होता. तालुक्यात ऑक्सिजनची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कराड व सातारा याठिकाणी पाठवावे लागत होते. मात्र तेथेही बेड व आक्सिजन उपलब्ध न मिळाल्याने तालुक्यातील जवळपास शेकडोच्यावर कोरोना बाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी पाटण येथे ऑक्सिजन बेडची उपलब्धता व्हावी यासाठी समाजातून वाढती मागणी होती. प्रशासनाकडूनही सामाजिक घटकांनी एकत्रित येवून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत यापुढे पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावू नये म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांनी तातडीने पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरला नवीन बेडसह २५ ऑक्सिजन सिलेंडर दिले होते. तसेच ही सर्व यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे काही रुग्णांचे प्राणही वाचले होते. यावर्षीही सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यात कोरोनाने कहर केला असून कराड व सातारा येथे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या २५ ऑक्सिजन सिलेंडरसह बेड उपलब्ध आहेत. मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता पुढील काळात ऑॅक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासू नये म्हणून तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी सामाजिक संघटनांनी पुढे येवून मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासोबत मदतीबाबत चर्चा केली. या मदतीला होकार देत त्यांनी सामाजिक बांधिलकीतून आणखी २५ ऑक्सिजन सिलेंडरसाठी १ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्याचा धनादेश संबंधित कंपनीला देण्यात आला आहे. लवकरच अतिरिक्त २५ ऑक्सिजन सिलेंडबर पाटणमधील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल होतील. यामुळे पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी कराड व सातारा येथे जावी लागणारी पळापळ थांबणार आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशासनासह पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत असून त्यांना धन्यवाद दिले आहेत

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular