Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीबेटी बचाव बेटी पढाओ साठी तरूणींची सायकल मोहीम

बेटी बचाव बेटी पढाओ साठी तरूणींची सायकल मोहीम

भुईंज ःप्रदुषणमुक्ती आणि बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश देत काश्मिर ते कन्याकुमारी सायकल निघालेल्या दोन युवतीचे पाचवड याठिकाणी जीवन प्रकाश हॉस्पिटलचे डॉ.मनोहर ससाणे यांनी त्यांचे हस्ते हाऱ पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सायली महाराव वय 19 वर्षे राहणार मुंबई तर पुजा बुधावले वय 23 वषेराहणार देहूरोड पुणे अशी त्यांची नावे आहेत. बेटी बचाव आणि प्रदुषणमक्तीचा संदेश घेवून चाललेल्या मुलींचे ठिकठिकाणी स्वागत करून प्रोत्साहन दिले जात आहे. या दोन रणरागिणी 30 नोव्हेंबर 2017 ला जम्मू येथून निघून हरियाना़ पंजाब़ राजस्थाऩ गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाल्यांवर त्यांचे स्वागत झाले.
त्यांनी गुरूवारी दिनांक 21 डिसेंबर 2017 रोजी पुणे येथून निघून ठिकठिकाणी स्वागत स्विकारत पाचवड
येथील मधूमेह तज्ञ डॉ.मनोहर ससाणे यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.बेटी बचाव बेटी पढाओ आणि प्रदुषणमुक्ती हा संदेश घेवून समाज प्रबोधन करत काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत जात आहेत. सायली आणि पुजा या दोघी सुद्धा पुणे येथे कॉलेज शिकत आहेत. अजय पडवळ हे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट यांच्या स्मरणार्थ हा मोठा प्रवास या दोघी करत आहेत. त्यांना माऊंटन स्पोर्ट अ‍ॅकाडमी बोरवली मुंबई चे नंदू चव्हाण यांनी प्रोव्हीज कंपनीच्या दोन सायकल़ टी शटऱ् हेलमेट उपलब्ध करून दिले आहे. या दोन्ही रणरागिणी रोज 100 ते 150 किलो मीटरचा प्रवास करतात त्या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवडयात कन्याकुमारी येथे पोहचणार असल्याची माहिती पुजा व सायली यांनी दिली. पुणे पासून सातारा पर्यंत त्यांना सचिन गायकवाड़ सुनिल ननावरे़ सचिन मोरे आणि सत्यवान शिरसाट या सायकल पट्टूंनी यांनी सहकार्य करून साथ दिली.
पाचवड येथे त्यांचे स्वागतावेळी डॉ.मनोहर ससाणे़ भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस इनस्पेक्टर जगन्नाथ फरांदे़ पोलीस सी.ए.मुंगसे़ जनता अर्बन बॅकेचे मॅनेजर खालीद इनामदाऱ सौ.अनिता ससाणे़ विदुला रणदिवे़ डॉ.रणजित गायकवाड़ उमा जगताप़ सुनंदा वारागडे़ विजय तरडे़ समीर शेख़ लक्ष्मण गायकवाड़ संजय चव्हाण़ स्वाती जगताप़ सागर शिंदे इत्यादी उपस्थितीत होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular