सातारा : सायगाव ता. जावळी येथे भगवान बुद्ध यांच्या 2563 व्या जयंतीनिमित्त आज सामुदायिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बौद्ध विकास सेवा संघ, सायगावचे अध्यक्ष प्रेमानंद जगताप यांच्या हस्ते बुद्ध धमध्वज रोहन करण्यात आले.गेली अनेक वर्षे सायगाव परिसरात संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानंतर विविध प्रकारच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ,स्पर्धा व सायंकाळी साडेसहा वाजता भव्य मिरवणूक व जाहीर सभा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या निमित्त सायगावचे युवा सरपंच अजित आपटे, चित्रकार राजेंद्र जगताप, जेष्ठ मार्गदर्शक वामनराव जगताप, किसन जगताप, दिनकर जगताप, जयवंत जगताप, श्याम जगताप, संतोष जगताप, उदय जगताप, गौतम जगताप व संघटनेचे सचिव विधाधर जगताप, राजरत्न जगताप,किरण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा सायगाव येथील बुद्ध विहाराचे काम पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी सर्व सभासदांनी आपली वर्गणी देऊन सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष प्रेमानंद जगताप यांनी केले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच बुद्ध विहाराचे काम पूर्ण करून आरंभ केला जाणार आहे. यासाठी सर्व सभासदांचे सहकार्य लाभले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, जावळी तालुक्यातील अनेक गावातील बौद्ध वस्ती मध्ये मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली होती.मर्ढे येथे लवकरच बुद्ध विहार बांधण्यासाठी सर्व बांधव एकत्र येणार असल्याची माहिती युवा नेते श्याम रोकडे व अमोल रोकडे, महेश रोकडे यांनी दिली आहे
सायगाव येथे बुद्ध जयंतीनिमित्त सामुदायिक कार्यक्रम
RELATED ARTICLES