Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीग्रेड सेपरेटरच्या कामात साठलय तळे

ग्रेड सेपरेटरच्या कामात साठलय तळे

सातारा (एकनाथ थोरात) : सातारा शहरात ग्रेड सेपरेटरच्या कामाने वेग घेतला असून पोवईनाका ते बढीया पेट्रोलपंप मार्गावरील ग्रेड सेपरेटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरक्षक भिंतीलगत सुरु आहे. या ठिकाणी खोदलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून तळे निर्माण झाले आहे. महाराजा सयाजीराव हायस्कूल बाजूकडून उताराने स्लॅप टाकण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.
9 मे रोजी कर्मवीर भाउराव पाटील यांची जयंती असते त्यावेळी अनेक नेतेमंडळी उपस्थित राहतात लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी ये जा करता यावी म्हणून ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. हॉटेल महाराजाकडून येणारी वाहतूक लिलावती कॉम्प्लेक्स जवळील वीज वितरणच्या खांबाजवळून वळविण्यात येवून रविवार पेठेतून ये जा करण्यासाठी छोटा मार्ग तयार केला आहे. मात्र हा मार्ग अरुंद असल्याने वाहतुक कोंडी पहायला मिळत आहे. एवढ्या गर्दीतही रिक्षातळ सुरुच असून समर्थ मंदिर, राजवाडा या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाची तत्पर सेवा सुरुच आहे. त्यातच कामामुळे उडणारी धुळीमुळे सर्वांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लिलावती कॉम्प्लक्स समोरचे ग्रेड सेपरेटरचे काम तातडीने पूर्ण झाले तर किमान महाराजा बाजूकडून शहरात ये जा करण्यासाठी वाहतुक खुली होईल. ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी 60 कोटीची तरतूद असून या मध्ये आता कराड कोल्हापूर बाजूकडे जाणार्‍या रस्त्यावरील काम सुरु आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीलगत केलेल्या खुदाईत पाणी साचून तळे निर्माण झाल्याने येणारे जाणारे नागरिक हे तळे कुतुहलाने पहात आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular