सातारा ः सातारा जिल्ह्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रात गेली 30 वर्षे दैदिप्यमान कार्य करणार्या समर्थ एज्युकेशनल ट्रस्टच्या अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या सेतु सेंटरला प्रवेश नियंत्रण समिती यांनी मान्यता दिली असून मेडीकल शाखेतील एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीएएसएलपी, बीपी अँड ओ व बी.एस.स्सी. (नर्सिंग) या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन रिजस्ट्रेशन/ अॅप्लिकेशन फॉर्म ची मुदत 26 जून 2019 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशनचे पेमेंटची मुदत 26 जून 2019 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंतआहे. रजिस्टर्ड उमेदवारांची लिस्ट 26 जून 2019 रोजी सकाळी 10 नंतर प्रकाशित होणार आहे व कागदपत्रांची छाननी त्या त्या सेंटरवर दि. 28 जून ते 3 जुलै 2019 रोजी होणार आहे.
मेडीकल अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सोयीसाठी पोवई नाका रजतसागर कॉम्प्लेक्स येथे तसेच अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पानमळेवाडी, सावकार होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज एम.आय.डी.सी, व सावकार फार्मसी कॉलेज जैतापूर या चार ठिकाणी मोफत सेतू सेंटरची उपलब्धता करण्यात आली आहे. याठीकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन अरविंद गवळी यांनी केले आहे.
मेडीकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सावकार ग्रुपच्या सेतु सेंटरला शासनाची मान्यता
RELATED ARTICLES