Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीदेवस्थानच्या इतिहासात प्रथमच महिला उमेदवारांचे अर्ज दाखल

देवस्थानच्या इतिहासात प्रथमच महिला उमेदवारांचे अर्ज दाखल

जनशक्तीकडून दोन महिला उमेदवार, महिलांनी केले स्वागत
पुसेगाव : श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पंचवार्षिक निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. जनशक्ती आणि ग्रामविकास संघटनेच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वडूज येथील तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
नागरिक संघटनेने मागील आठवडयातच अर्ज दाखल केले असल्याने जनशक्ती आणि ग्रामविकास संघटणेचे कोण कोण उमेदवार असणार? याकडे सार्‍यांचे लक्ष असताना श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेने श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच कोणी महिला उमेदवारांनी विश्‍वस्त पदसाठी अर्ज दिल्याने जनशक्तीच्या या निर्णयाने राजकीय उलथापलथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज जनशक्तीच्या वतीने माजी सरपंच शुभांगी प्रविण जाधव आणि निता जयवंत जाधव या महिला उमेदवारांसह पॅनल प्रमुख उपसरपंच रणधीर जाधव, अंकुश पाटील, सुरेश जाधव, अनिल बोडके, सोपान जाधव, निलेश जाधव, संदिप जाधव, विकास जाधव, केशव जाधव, श्रीकृष्ण जाधव, टि. एन. जाधव, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर श्री सेवागिरी ग्रामविकास संघटनेच्या वतीने विद्यमान विश्‍वस्त अ‍ॅड. विजयराव जाधव, सतिश फडतरे, जगनशेठ जाधव, सुसेन जाधव, बजिरंग देवकर, सचिन देशमुख, शेखर जाधव, श्रीकांत जाधव,  बाळासाहेब जाधव, यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर मागील आठवडयात श्री नागरिक संघटनेच्या वतीने विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश जाधव, मोहन पाटील, बाळासाहेब जाधव, प्रताप जाधव, सुनिलशेठ जाधव, संतोष तारळकर, योगेश देशमुख, सर्जेराव जाधव, शिवाजीराव जाधव, विजय जाधव आदींनी अर्ज दाखल केले आहेत. यंदा तिहेरी लढत असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर असल्याने त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
जनशक्ती संघटनेने महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने पुसेगावच्या इतिहासात देवस्थान ट्रस्टमध्ये महिला विश्‍वस्त लोकांच्यातून निवडुण जाण्याची संधी चालुन आल्याने पुसेगावमधील महिला वर्गातून जनशक्तीच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत आहे.
जनशक्तीचा दे धक्का

 

जनशक्तीचे उमेदवार कोण? ही चर्चा रंगली असताना जनशक्तीचे नेते रणधीर जाधव यांनी दोन महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अनेकांना धक्का बसला. कोणाच्या ध्यानी मनी नसताना अचानक महिला उमेदवारांचे नाव पुढे आल्याने रणधीर जाधव यांच्या खेळीची चर्चा पुसेगाव व परिसरात रंगली होती.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular