Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसेवागिरींच्या रथावर 58 लाखांच्या देणग्या अर्पण 

सेवागिरींच्या रथावर 58 लाखांच्या देणग्या अर्पण 

खटाव : इतर राज्यासह महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातून पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात 58 लाख 43 हजार 852 रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रथावरील देणगीत 7 लाख 64 हजार 601 रूपयांची वाढ झाली आहे. श्री सेवागिरींच्या 70 व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि 17.डिसेंबर रोजी पुसेगाव ता.खटाव येथे सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. रथ मिरवणुकी दरम्यान रथावर अमेरीका,इंग्लंडसह विविध देशातील परदेशी चलनांच्या नोटा भाविकांकडून अर्पण करण्यात आल्या आहेत
रथोत्सवाच्या दिवशी पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोंटाच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी 11 वाजल्यापासून गर्दीत प्रचंड वाढ होऊन बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला.यंदा दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular