केळघर, ता:८:गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अशोक चक्र सन्मानित हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला राज्य सरकारने निधी दिला असून
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री व जावली चे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प पुरवणी यादीत हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दिली. या स्माररकास भरीव निधी देणार असल्याचे यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला शब्द पूर्ण केला असून लवकरच स्मारकाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, अशी माहिती शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकणाथ ओंबळे यांनी दिली. हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी श्री. ओंबळे यांनी नुकतीच मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांची पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत भेट घेऊन चर्चा केली होती. पालकमंत्री देसाई यांच्या समवेत भेट घेतली असता मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे शी बोलून भरघोस निधी याच अधिवेशनात देण्याचे जाहीर केले. या कामी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या स्मारकासाठी आमदार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व एकनाथ ओंबळे यांनी गेले अनेक दिवस सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या अशोक चक्र सन्मानित हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी स्मारकाला निधी उपलब्ध झाला .त्याबद्दल महायुती सरकारचे तमाम जावलीकरांच्या वतीने जाहीर अभिनंदन व आभार मानण्यात आले आहेत. स्मारकाला निधीची तरतूद करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.रोकडे जिल्हा नियोजन चे शशिकांत माळी तसेच ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सागर मनोरे व गौरी चौकेकर यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले.
२६/११/२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान चा क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब ला हातातील लाठीच्या साहाय्याने जिवंत पकडण्याची अतुलनीय कामगिरी जावळी तालुक्याचे सुपुत्र तुकाराम ओंबळे यांनी केली होती. तुकाराम ओंबळे यांना या हल्ल्यात वीरमरण आले होते.हुतात्मा ओंबळे यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी त्यांच्या केडंबे या जन्मगावी भव्य स्मारक राज्य सरकारने करावी अशी मागणी वेळोवेळी जावळी तालुक्यातील नागरिक करत होते. गेल्या १६वर्षापासून हे स्मारक रखडले होते. अर्थदांकल्पाच्या पुरवणी यादीत या स्मारकासाठी निधी मंजूर झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.