साताराः माझ्या वडिलांनी पहिलेले स्वप्न आज या शाळेला देणगी देवून पूर्ण होत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. आजच्या विज्ञान प्रेरित जगात आपल्या शालेय मुलांनी मागे न राहता योग्य दिशेने या संगणकाच्या मदतीतून पाऊल उचलावे असे आवाहन मी करतो असे उदगार डॉ. सतिश कुलकर्णी यांनी काढले.
द रोटरी फाउंडेशन ग्लोबल ग्रॅन्ड अमेरिका, रोटरी क्लब ऑफ वाई यांचेवतीने सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलला 45 डिजीटल क्लासरूप, 20 संगणकाची डिजीटल लायब्ररी, दोन विज्ञान प्रयोगशाळा भेट देण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अमेरिकास्थित रोटेरियन डॉ.सतिश कुलकर्णी यांनी वरील उदगार काढले.या कार्यक्रमाचे साठी डॉ.सतिश कुलकर्णी यांच्या पत्नी व रोटेरियन डॉॅ.सौ.नंदिनी कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कौन्सिल मेंबर सौ.सविता केळकर, रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, सातारा येथील माजी डिस्ट्रीक्ट गर्व्हनर व शाळेचे माजी विद्याथीृ रो. इस्माईल पटेल, वाई क्लबच्या प्रकल्प प्रमुख व सदस्या सौ.स्वाती हेरकळ, शाळेच्या शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी, डिजीटल क्लासरूम लायब्ररीचे मार्गदर्शक विरेन धरमसी, मिनी सायन्स सेंटरचे मार्गदर्शक आशुतोष पंडीत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्य हस्ते न्यू इंग्लिश स्कूलच्या या 45 डिजीटल क्लासरूम 20 संगणक डिजीटल लायब्ररी व दोन विज्ञान प्रयोगशाळेचे उदघाटन फीत कापून व कोनशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर गणेश सभागृहापुढील मैदानात आयोजित या उदघाटन सोहळयाची सुरवात प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने झाली. सचिन राजोपाध्ये व बाल वाद्यवृंदाने स्वागतगीत व विज्ञानगीत सादर केल्यावर सर्व मान्यवरांचा सत्कार सौ.स्नेहल कुलकर्णी, प्रमोद शिंदे, व स्वाती हेरकळ यांचे हस्ते तुळशीचे रोप, शाल, व भेटवस्तू देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशालाप्रमुख डी.एस.कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. स्वाती हेरकळ यांनी करून दिला. यावेळी शाळेचे कलाशिक्षक घनःश्याम नवले, व संदीप माळी यांनी पाहुण्यांची 10 मिनिटात रेखाटलेली रंगचित्रे पाहुण्यांना भेट देण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे सतिश कुलकर्णी म्हणाले की, सातारा नजीकच्या महागाव येथील माझे पिताश्री स्व.रामकृष्ण कुलकर्णी व मातोश्री स्व.सुशीला कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी शाळेला ही मदत करत आहे. त्याचा मला खूप आनंद होत आहे. आपण शिकलात तरच देश पुढे जाईल आपल्या शिक्षणातून तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता.
यावेळी डॉ.नंदिनी कुलकर्णी यांनी शाळेचा आम्हा सर्वाना खूप आदर आणि अभिमान वाटतो. संपूर्ण जग तुम्हा नव्या पिढीसाठी आव्हान आहे. कोणतीही मदत लागली तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा आमच्याकडून जमेल ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यावेळी सौ.सविता केळकर यांनी सर्व विद्यार्थ्याना खूप खूप शिका मोठे व्हा आणि शाळेसाठी काहीतरी करून दाखवा असे आवाहन केले.
आभार प्रदर्शनात सौ.स्नेहल कुलकर्णी यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या शाळेला खूप मोलाची मदत केली आजचा हा उपक्रम अशाच एका दातृत्ववान अशा उदार मनाच्या आणि शाळेवर प्रेम करणार्या व्यक्तीच्या स्मरणार्थ होत आहे याचा खूप आनंद वाटतो. मिळालेल्या या देणगीचा वापर योग्य करावा व त्यातून अपण शिक्षण घेवून मोठे व्हावे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.अर्पणा जाधव यांनी केले.कार्यक्रमास विक्रम कुलकर्णी, सौ.नीला कुलकर्णी, रोटेरियन डॉ.शरद अभ्यंकर, ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांचेसह शाळेेचे पर्यवेक्षक दिलीप रावडे, सौ.लता दळवी, सौ.निलम तिरमारे, सुजाता पाटील, यांचेसह वाई, सातारा,लोणंद येथील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, शाळेचे शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वर्ग मोठया संख्येंने उपस्थित होते.
विज्ञानप्रेरित जगात शालेय मुलांनी योग्य दिशेने पाऊल उचलावेः डॉ.सतिश कुलकर्णी
RELATED ARTICLES