Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीके.एस.डी शानभाग विद्यालय आणि ज्यु. कॉलेजच्या इनडोअर बॉक्सिंग रिंगचे उदघाटन

के.एस.डी शानभाग विद्यालय आणि ज्यु. कॉलेजच्या इनडोअर बॉक्सिंग रिंगचे उदघाटन

सातारा : सातारा येंथील शामसुंदरी रिलीजीअस अँड चॅरीटेबल ट्रस्टचे के.एस.डी शानभाग विद्यालय आणि ज्यु. कॉलेजच्या इनडोअर बॉक्सिंग रिंगचा उदघाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सातरा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी तसेच ऑलंपिक बॉक्सर खेळाडू मनोज पिंगळे,भारतकुमार व्हावळ, उपाध्यक्ष महाराष्ट्र बॉक्सिंग अ‍ॅकंडमी ,ले. कर्नल रणजीत नलावडे , सातारा बॅक्सिंग संघटनेचे अध्यक्ष हरिष शेट्टी,तसेच मा.कॅप्टन साळूंखे , अमर मोकाशी, सागर जगताप यावेळी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रिडा मागर्ंदर्शक रमेश शानभाग, संचालिका सौ उषा शानभाग, संचालिका सौ.आंचल घोरपडे, मुख्याध्यापिका सौ रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकणीं तसेच विद्यार्थि व विद्याथिंनी प्रतिनिधी यांनी केले. मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन केल्यावर या र्बौविसंग रिंग मैदानाचे फीत कापुन उदुघाटन संपन्न झ़ाले.यावेळी उदघाटन सत्रात शाळेचे बॉक्सिंग खेळाडू ओम कदम व यश साठे यांचा शाळेतर्फे मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या सत्कार प्राप्त खेळाडूंनी आपल्या खेळाचे सादरीकरण केले. ऑलिंपिक खेळाडू मनोज पिंगळे यांनी बॉक्सिंग रिंग तसेच विविध खेळाप्रती शानभाग कुटुंबियांचे प्रेम पाहून मी भारावून गेलेा आहे.या इनडोइर रिंगमुळे सातारा येथील खेळाडूना मोठा फायदा घेता येईंल व त्यातूनच भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सातारा निंर्माण करेल अशी खात्री वाटत असल्याचे सांगतिले. भारत कुमार व्हावळ यांनी साार्तार्ंयात अश्या प्रकारची अद्यावत बॉक्सिंग रिंग नव्हती. पुर्वी या खेळाला प्रतिसादही मिळत नव्हता. परंतू आता पालक जागरुक झाले असून याचा फायदा सर्वानाच भविष्यात होइंल.
ले.कर्नंल रणजीत नलावडे यांनी यावेळी आजची शैक्षणिक पध्दती व खेळाविषयी मामिंक शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. एकच विद्यार्थी अभ्यास खेळ व इतर कलागुण जपु शकतो. त्यासाठी त्याला प्ऱोत्साहन देण्याची गरज आहे. ध्येय व प्रयत्न असतील तर आजची पिढी मागे रहाणार नाही., पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपले ध्येय उच्च ठेवले पाहीजे. हरिष शेट्टी यांनी आपले मनोगत व्यकत करताना रमेश शानभाग यांचे विशेष अभिनंदन करुन ही उत्कृष्ट बॉक्सिंग रिंग आपल्या शाळेत उपलब्ध करुन दिली. या बद्दल आभार मानले व भविष्यात या बॉकिसंग रिंंगचा उपयोग सातारचे खेळाडू निश्‍चित करुन घेतील अशी ग्वाही दिली. कॅप्टन साळूंखे यांनी बॉक्सिंग खेळातील योगदानाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, पुर्वीच्या सोयी सुविधा आणि आत्ता मिळत असलेल्या सुविधांबद्दल खूपच बदलल्या आहेत. त्याचा फायदा करुन घ्या आणि ध्येय गाठा.
रमेश शानभाग यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. समारंभाचे सुत्र संचालन मोहन यादव व सौ.आचल घोरपडे यांनी केले. समारंभास शाळेचे सर्व विश्‍वर्स्ंत पालक, विद्यार्थी,विद्याथिंनी, तसेंच एकलव्य बॉक्सिंग अ‍ॅकॅडमीचे खेळाडू उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular