साताराः गेली जवळपास 10 वर्षे अत्यंत क्लिष्ट अशा डोक्यावरील जटेच्या बंधनात अडकलेल्या व जटेमुळे मनाचा कोंडमारा झालेल्या व त्यामुळे डोके सतत जड वाटणे, एकटेपणा जाणवणे, सतत डोकेदुखीचा त्रास अशा विचित्र अवस्थेत व मनस्थितीत असलेल्या शरयू विलासराव वारंग, रा.तारळे, ता.पाटण, जि.सातारा या महिलेला जटामुक्त करण्यासाठी महा.अंनिसला यश आले. वारंग कुटुंबीय व नातेवाईक यांचे मत परिवर्तन करण्यासाठी अंनिसचे उपाध्यक्ष विलास भांदिर्गे, प्रभाकर शिंदे यांचे समुपदेशन महत्वाचे ठरले. परिवर्तन संस्थेमध्ये उदय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दीड ते दोन तास या क्लिष्ट जटा सोडवण्याचे कामकाज कार्याध्यक्ष हौसेराव धुमाळ, जिल्हा प्रधान सचिव वंदना माने, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, जयप्रकाश जाधव यांच्या सहकार्याने पार पडले.
शरयू विलासराव वारंग या 58 वर्षीय महिलेला केले जटामुक्त
RELATED ARTICLES

