केळघर : शाळाच आपले घर समजून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शाळाच आपले घर समजून जावळीतील शिक्षक काम करतात.मात्र अश्या काम करणार्या भामघर प्राथमिक शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक विठ्ठल जोशी यांच्या बदलीने अख्खा गाव हळहळला. अन्यत्र बदली झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करीत त्यांच्या गावातील शिक्षकी सेवेचा गौरव केला.
भामघर शाळेत दहा वर्षे विठ्ठल यमना जोशी यांनी आदर्श सेवा बजावली होती.भामघर ही शाळा शाळा सिद्धी मध्ये अ श्रेणीत आणत,आय एस ओ केली होती.शाळेचे वर्ग बोलके करून शाळेचा भौतिक दर्जादेखील त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने उंचावला होता.तर शाळेला स्वच्छ सुंदर शाळा बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.अशा शिक्षकाची अन्यत्र बदली झाल्यामुळे सारा गाव हळहळला होता.
त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करीत ग्रामस्थांच्या वतीने जोशी यांचा नागरी सत्कार करण्यात आला.तर यावेळी शिक्षक जोशी यांनी ग्रामस्थांनी दिलेली प्रेम-आपली तसेच सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील विठ्ठल जोशी हे पंधरा वर्षांपूर्वी जावळी तालुक्यात शिक्षकी सेवेत हजर झाले,त्यांनी तालुक्यात करंदी,भामघर येथे सेवा बजावत आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवला . त्यांची नुकतीच पुणे जिल्ह्यात बदली झाली याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी संपत भामघरे ,रामभाऊ सावंत,बजरंग पाटणे,गणपत धनावडे, बापू सावले,शंकर सावले, केंद्र प्रमुख मिलिंद जगताप, दत्तात्रय शेटे, तानाजी केमदारणे,मीराबाई सावले ,चंद्रभागा शेलार जानाईदेवी मित्र-फंड मंडळ मुंबई ग्रामस्थ उपस्तिथ होते.यावेळी सुत्रसंचालन सौ.शोभा धनावडे यांनी केले तर आभार आण्णासाहेब दिघे यांनी केले.
प्राथमिक शिक्षकाच्या बदलीने हळहळले विद्यार्थी -पालक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार : भामघर मधील शिक्षकाची अन्यत्र बदली
RELATED ARTICLES