कोंडवे : सेवानिवृत्तीचा काळ सुखाचा असे समजून आराम करणारे अनेक भेटतील पण, आपल्या श्रमातून उभी राहिलेल्या शिक्षक बँकेसाठी स्वखर्चाने सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे बँकेचे माजी संचालक श्री शंकरराव भुजबळ व धुमाळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, जुन्या काळातील आदर्श शिक्षक असूनही कधी ही पुरस्कार व वैद्यकीय आर्थिक मदत न घेणारे श्री भुजबळ गुरुजी हे ८४वर्षाचे आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी ते शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असले तरी आपली सामाजिक बांधिलकी सोडली नाही. शिक्षक बँकेचे माजी संचालक असल्याने बँकेच्या कारभाराबाबत आज ही तोंडपाठ आकडेवारी लक्षात आहे. स्वतःच्या मोटार सायकलने सेवानिवृत्ती नंतरही प्रचारात उतरले आहेत. सातारा जिल्हा सेवानिवृत्ती संघटना अध्यक्ष म्हणून श्री भुजबळ व किडगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सरचिटणीस वसंतराव धुमाळ हे ८१ वर्षाचे आहेत. सातारा जिल्हाभर सभासद परिवर्तन पॅनेलचा प्रचार करीत आहेत. शिक्षकांनी सदविवेक बुद्धीने शिक्षक बँकेच्या निवडणुकीत मतदान करावे. बँकेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी जागरूक रहावे.भ्रष्टाचार मुक्त शिक्षक बँकेची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यत त्यांनी स्वखर्चाने सुमारे सहाशे शिक्षक-शिक्षिका यांना शिक्षक बँकेच्या कामकाजाबाबत माहिती दिली आहे. तसेच ‘कपबशी’ चिन्ह पोहचविले आहे. त्यांच्या परिश्रमाचे निश्चितच सर्वांना चांगले फळ मिळणार आहे. ही पांढऱ्या पाषाणा वरील आकर्षक रेघ ठरली आहे. श्री भुजबळ व श्री धुमाळ यांचा आदर्श घेऊन जेष्ठ सभासद श्री साहेबराव कदम,सिकंदर मुल्ला,भानुदास दीक्षित, श्री विलासराव घोलप, ना बा शिंगटे, विलासराव गोसावी,कृष्णाजी गुरव,सुदाम साळुंखे, रा ना साबळे, बाळू बरकडे,अशोक कांबळे,आत्माराम रसाळ, सोपान शिंगटे,,बा रा माईनकर,पा वि धनावडे, सौ मालन गुजर, सौ शहनाझ तडसरकर यांनी ही प्रचारात मोलाचा वाटा उचलला आहे.
त्यांचा आदर्श घेऊन तरुण तडफदार शिक्षक व शिक्षिकांनीही सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रचारात पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांचे ही कौतुक केले जात आहे.