वडूज : निमसोड (ता. खटाव) येथील शितोळे बंधूंनी सार्वजनिक जीवनात आदर्शवत काम करुन आपला वेगळा ठसा उमटवला आहे असे मत राज्याचे महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
वडूज येथील शितोळे बंधूंच्या यशवंती ज्वेलरी अॅन्ड स्टील सेंटरला मंत्री पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सहकार परिषदेचे शेखर चरेगांवकर, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, युवा नेते निलेश पवार, उध्दवशेठ शितोळे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष कृष्णत शितोळे, माजी उपसरपंच नथुराम शितोळे, सिताराम शितोळे, दिपक हारुगडे, बाळासाहेब शितोळे, दादासाहेब शितोळे, राजूशेठ शितोळे, संतराम शितोळे, श्रीमती यशोदा शितोळे, वंदना शितोळे, शुभांगी पवार उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, शितोळेवाडीसारख्या छोट्या गावात जन्म घेतलेल्या शितोळे बंधूंनी उद्योग, व्यवसायात निमसोड, वडूज पासून सातारा, बेंगलोर पर्यंत मोठी गगणभरारी घेतली आहे. उद्योग, व्यवसायाबरोबर त्यांनी राजकारण, समाजकारणात सक्रीय सहभाग घेत असतात. या घराण्याला दोनवेळा निमसोडचे सरपंचपद भूषविण्याचा माण मिळाला. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. गावचे माजी सरपंच व शितोळे बंधूंचे वडील स्व. पै. आप्पासाहेब शितोळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी राज्यस्तरीय कुस्ती मैदान भरविण्यात येते ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. अश्या प्रकारे वडीलांच्या कार्याचे कायम स्मरण ठेवणार्या बंधूंचा आदर्श इतरांनी घ्यावा. भविष्यात शितोळे बंधूंच्या उद्योग व सामाजिक कार्यास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भक्कम पाठबळ दिले जाईल.
शितोळे बंधूंचे कार्य आदर्शवत : ना.चंद्रकांतदादा पाटील
RELATED ARTICLES