पाटण :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पाटण महालातील प्रमुख असलेल्या सुंदरगड ( घेरादात्तेगड ) वर “छत्रपती शिवजयंती” मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हजारो शिवमावळ्यांच्या उपस्थित साजरी झाली. रविवार पासूनच सुंदरगडावर शिवमावळे किल्ल्यावर हजेरी लावत होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव या घोषणांनी आणि ढोल ताशाच्या आवाजात सुंदरगड दणानुंन गेला. किल्ला परिसर व पाटण महालातील सर्वच गांवानी किल्यावरुन शिवज्योती प्रज्वलित करुन नेल्या.
रविवार “सुंदरगड” दुर्ग पुजन, ध्वज पुजन, “छत्रपती शिवाजी महाराज” यांची प्रतिमा पूजन, शिवज्योत पुजन आणि शिववंदना असा कार्यक्रम झाला. यावेळी पिंपळगाव येथील शेकडो महीलांनी गढवाली केली. शिव मावळ्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबवली. सायंकाळी ६ .३० वा. गडावरुन निसर्गाचे सौंदर्य प्रतिक असलेले सुर्यास्त दर्शन सर्व शिवमावळ्यांनी अनुभवला. तर रात्री ९ वा. शिववंदना झाल्यानंतर पुढे रात्रभर शिवजागर करण्यात आला. शिवजयंती दिनी सोमवार पहाटे ३ वा. पासुनच शिवज्योत प्रज्वलित करून आप आपल्या गावी नेण्यास सुरुवात केली. गव्हाणवाडी, चोपडी, त्रिपुडी, पिंपळगाव ( कवरवाडी ), मेंढोशी वरची, मेंढोशी खालची, येराड, मोरगिरी, पाटण, नाडे, नाटोशी, केर, कुंभार गाव, चाफळ- गणेवाडी, मंद्रुळ कोळे आदींसह ढेबेवाडी, तारळे, चाफळ, पाटण, मल्हारपेठ, मोरगिरी, कोयना या विभागातील शेकडो गावांतील हजारो शिवमावळ्यांनी शिवज्योत प्रज्वलित करून नेल्या. शिवमावळ्यांची किल्ल्यावर गर्दी ओसंडून वाहत होती. या गर्दीत शिव घोषणांनी आणि ढोल ताशा च्या गजराने सुंदरगड आक्षर्षाहा दणानुन गेला.
शिवजयंती निमित्त पाटण शहरात देखिल ठिक ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पाटण शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शाळा, महाविद्यालय यांच्या आकर्षक ईतिहासीक चित्ररथांचा सहभाग होता. तसेच पाटण शहरातील सर्वच गणेश उत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी केली. पाटण बरोबर मोरगिरी, कोयना, मल्हारपेठ, नवारस्ता, ढेबेवाडी, चाफळ, तारळे, मणदुरे, कुंभारगाव या विभागातील सर्वच गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
फोटो:- * पाटण शहरातील शिवप्रतिमेची भव्य
मिरवणूक.
* सुंदरगडावरील शिवजयंती उत्सव.