पाटण:- ईज्राईल, व्हियेतनाम सारख्या देशांनी छत्रपती शिवरायांची युध्दनीति वापरून स्वतःच्या देशाची परकीय आक्रमणापासून सुरक्षा केली. त्यामध्ये व्हियेतनाम ने जिंकलेले खाड़ीचे युध्द असो वा गेली पन्नास वर्षे एकही दहशतवादी हल्ला यशस्वी होऊ न देणारे ईज्राईल असो परंतु आम्ही अजुन शिवराय आणी त्यांची युध्द नीति समजावूनच घेतली नाही. देशाने आता शिवरायांची युध्दनीति वापरून पाक ला गनिमीकावा दाखवावा जेणेकरून देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिम्मतही त्याच्यात उरणार नाही .
शिवरायांचे चरित्र हे महाराष्ट्राचा फक्त इतिहास नाही तर अवघ्या भारताचे वर्तमान आणि भविष्य आहे.
शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती रामापुर (पाटण) यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानात यसुफ हकीम बोलत होते.
युसूफ हकिम आपल्या भाषणात पुढे म्हणाले. देशाला सुरक्षित आणी सक्षम बनवण्यासाठी युवकांनी शिवचरित्र अभ्यासने गरजेचे आहे. युवकांनी कोणत्याही क्षेत्रात शिवरायांच्या विचाराने वाटचाल केल्यास अपयश कधीही येणार नाही. शिवरायांचे अस्तित्व अजून गडकोटांमधे जिवंत आहे ते ज्वलंत ठेवण्यासाठी जाती पातीची, धर्म, पक्ष बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र येऊन दुर्ग संवर्धन मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे. एकेकाळी दुर्गांचा तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या पाटण तालुक्यातील अजुन काही दुर्ग उपेक्षित आहेत. आगामी काळात सुंदरगड बरोबरच त्या दुर्गांचेही संवर्धनासाठी सुंदरगड संवर्धन समिती सह गडकोट सारखी संस्था कार्य करणार आहे.
यावेळी तामकने प्राथमिक शळेचा विद्यार्थी तुकाराम शिंदे, याचेही शिव चरित्रावर व्याख्यान झाले. कार्यक्रमासाठी शंकराव कुंभार, अनिल भोसले, लक्ष्मण चव्हाण , अनिल बोधे, विकास घाडगे , सुहास औंधकर, दत्ता टोळे, मयूर सावंत, तानाजी भोसले, संदेश चौधरी, सूरज पंधारे, रुशि माने शिवजयंती उत्सव समिती व सुंदरगड संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारि मावळे आबालवृद्धासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राहुल खैरमोडे यांनी मानले.
शिवव्याख्यानाचे मानधन दिले सुंदरगडच्या
संवर्धनाला: यसुफ हकीम यांचे मोठे पण.
येथील स्थानिक युवक शिवमावळ्यांनी गेल्या दोन वर्षापासून सुंदरगड (दातेगड) संवर्धनाचे कार्य कोणत्याही शासकीय मदतीशिवाय श्रमदानातून सुरु केले आहे. या कामातून सुंदरगडाचे रुपडे पालटत चालले आहे. या श्रमदानात शिवव्याख्याते यसुफ हकीम यांचाही सहभाग नेहमीच आसतो. जिथे – जिथे शिवव्याख्याने होतील तितले मिळालेले मानधन सुंदरगड (दातेगड) संवर्धनासाठी देण्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्या प्रमाणे रामापूर येथे झालेल्या शिवव्याख्यानाचे मानधन हकीम सर यांनी कार्यक्रम ठिकाणीच सुंदरगड (दातेगड) संवर्धन समितीला सपरुधः केले.