सातारा : सातारा जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस शनिवार दि. 30 रोजी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त सातारा आणि जावली तालुक्यात शुक्रवार दि. 29 आणि शनिवार दि. 30 असे दोनदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता अजिंक्य ग्रुपच्यावतीने शहर पोलीस ठाण्याच्या समोर यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आश्रमात दिव्यांगांना मोफत तीनचाकी सायकल, वॉकर, कुबड्या व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कुस्ती स्पर्धा होणार आहे. रात्री 9 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवक सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात शिव- इंद्र 2019 सन्मान लोककलांचा हा मराठी सांस्कृतिक गीत, नृत्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात रेशम टिपणीस, सुकन्या कालन, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर यांच्यासह झी मराठीने गौरवलेले विजेते गायक आणि गायिका आपली कला सादर करणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे. शनिवार दि. 30 रोजी वाढदिनी सकाळी 8.30 वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे गारेचा गणपतीचे दर्शन घेवून सकाळी 9 वाजता शेंद्रे येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री तुळजा भवानी मातेचे दर्शन आणि स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले स्मृतीस्थळावर अभिवादन करणार आहेत. सकाळी 10 वाजता गोडोली येथील राजमाता जिजाऊ सभागृह, पालवी चौक येथे कर्तव्य सोशल ग्रुप आणि युवा मोरया सामाजिक संस्था, गोडोली मित्रसमुह यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाभिमानी रामोशी महासंघाच्यावीते सकाळी 11 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागात खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, वाढदिवसानिमीत्त आ. शिवेंद्रसिंहराजे शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत मेढा येथील कलश मंगल कार्यालयात जावलीतील जनतेच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर, सायंकाळी 6 ते 10 यावेळेत कोटेश्वर मैदानासमोरील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर आ. शिवेंद्रसिंहराजे शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत. या सर्व कार्यक्रमास सातारा जावलीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमीत्त आज, उद्या विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES