कोरेगाव : स्त्री शक्तीची उन्नती आर्थिक विकासातून प्रगती हा शिवनेरी सहकारी बँकेने संकल्प केला असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन, त्यांचा विकास साधण्यासाठी बँक कटीबध्द आहे, असे प्रतिपादन चेअरमन शिरीष देशपांडे यांनी केले.
बँकेच्या 23 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोरेगाव शाखेतर्फे महिला बचत गटातील सभासदांना उन्नती कर्जाचे वितरण देशपांडे यांच्याहस्ते महिला बचत गटातील सदस्यांना करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पूर्ण जैविक उपक्रमाचे कार्यकारी संचालक सुव्रत देशपांडे, बँकेचे माजी अध्यक्ष तानाजीराव शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील, शाखा व्यवस्थापक विजय पाटील, प्रवीण शेंड्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
देशपांडे पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून शिवनेरी बँकेने आपले स्थान निर्माण केले आहे. महिलांचे सबलीकरण करण्याबरोबरच आर्थिक विकास साधण्यासाठी बँकेने नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत. महिला बचत गटातील किमान दोन हजार सदसयंना या आर्थिक वर्षात सुमारे पाच कोटी उन्नती कर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी लागणारे सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य करण्यास प्रयत्नशील आहे.
पाटील म्हणाले, कोरेगावच्या बाजारपेठेत स्वयंरोजगार करणार्या श्री गणेश महिला बचत गटातील 11 सभासद सदस्यांना 2 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज वितरण करुन बँकेने महिला सबलीकरणासाठी पाऊल टाकले आहे. सातारा जिल्ह्यात बँकेने नवनवीन योजना आणल्या असून, व्यापारी, उोजकांसह सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुचिता बोधे, अर्चना पारखी, पल्लवी भोसले, राणी वाकडे, नौशाद बागवान, बबिता देंडे, वर्षा यादव, चैताली भोसले, वैशाली पवार, स्वाती बर्गे, ज्योती पवार यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.
महिला सबलीकरणासाठी शिवनेरी बँक कटीबध्द : शिरीष देशपांडे
RELATED ARTICLES

