साताराः चेन्नई येथे मद्रास मोटर स्पोर्टस क्लब आणि फेडरेशन ऑफ मोटर क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय डर्ट ट्रॅक स्पर्धेत सातार्यातील श्लोक घोरपडे याने तिसरा क्रमांक मिळविला.
श्लोक विक्रम घोरपडे हा सातार्यातील केएसडी शानभाग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पाचवीत शिकत आहे. श्लोक घोरपडे याने कोल्हापूर, पुणे तसेच चेन्नई येथे झालेल्या फेर्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. यामध्ये भारत देशातून पंधरा वर्षाखालील मुलांच्या बारा मुलांनी सहभाग घेतला. या सर्वामध्ये त्याने तिसरा क्रमांक मिळविला.
त्याला अमेरिकेतील प्रशिक्षक डस्टी फारेस यांनी मार्गदर्शन केले. तसेच रमेश शानभाग, संकेत शानभाग, विक्रम घोरपडे यांचेही मार्गदर्शन लाभले . विद्यालयातर्फे त्याचे कौतूक होत आहे
राष्ट्रीय डर्ट ट्रॅक स्पर्धेत श्लोक घोरपडे तिसरा
RELATED ARTICLES