Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकैलास स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना बालाजी ट्रस्ट, श्री विनोद लाहोटी व विशाल कणसे यांचे...

कैलास स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना बालाजी ट्रस्ट, श्री विनोद लाहोटी व विशाल कणसे यांचे तर्फे किराणा किटचे वाटप ; तसेच सर्व कर्मचारी व त्यांच्या घरच्यांचे थर्मल स्क्रिनिंग

सातारा :- श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट हा साताऱ्यात कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो . संपूर्ण शहरातील सॅनिटायझर फवारणी असो किंवा रिक्षाचालकांना जीवनावश्यक  वस्तूंचे वाटप या  कोरोनाच्या संकटातही   त्यांनी आपले सामाजिक दायित्व जपलेल्याचे वारंवार दिसत आहे . याचप्रमाणे आज कैलास स्मशानभूमी तील कर्मचारी यांना बालाजी ट्रस्ट, श्री विनोद लाहोटी  व विशाल कणसे यांचे तर्फे किराणा किट वाटप करणेत आले.

या वेळी सर्व कर्मचारी व त्यांच्या घरच्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले, त्याच प्रमाणे कर्मचारी यांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून केंद्रीय होमिओपॅथी अनुसंस्थान यांच्या मार्गदर्शना नुसार डॉ रवींद्र भोसले यांच्या सल्ल्याने होमिओपॅथी ची औषधे कर्मचारी व कुटुंबातील व्यक्ती ना देण्यात आली. ट्रस्ट चे जयदीप शिंदे ,आणि संतोष शेंडे यांनी राजेन्द्र चोरगे ,संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular