Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीश्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे वितरण संपन्न

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे वितरण संपन्न

साताराः महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासोहब आंबेडकर दलितमित्र तसेच कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या तसेच सातारा जिल्हयात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून उपक्रमशील ठरलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दलितमित्र शिवराम लक्ष्मण माने (गुरूजी) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा, शिवकला जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ, शिवकला गौरव पुरस्कार वितरण सोहळा, स्वा.सै.कै.बाबुराव जंगम गुरूजी स्मृती कोडोली भूषण पुरस्कार वितरण सोहळा, शिवकला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ, शिवकला चषक जिल्हास्तरीय भजनी मंडळ स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ, विशेष सत्कार समारंभ आदी. भरगच्च कार्यक्रम मा.खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत, आ.श्री.आनंदरावजी पाटील यांचे शुभहस्ते तसेच नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात माने कॉलनी, देगांवरोड, एम.आय.डी.सी. सातारा या ठिकाणी संपन्न झाले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र शिवराम माने (गुरूजी) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवरांसह कोडोली, समर्थनगर, संभाजीनगर, देगांव, जैतापूर, कारंडवाडी, खिंडवाडी, गारवडी, कुसवडे, चिखली, जायगांव या गावातील ग्रामस्थांनी व पदाधिकारी यांनी श्री शिवराम माने (गुरूजी) यांचे अभिष्टचिंतन केले. व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या संपूर्ण हयातभर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करणार्‍या व्यक्तीस संस्थेच्या वतीने दिल्या जाणार्‍या शिवकला जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या पुरस्काराने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा.आ.डॉ.सौ.कांताताई नलावडे यांना त्याचप्रमाणे छत्रपतींच्या राजघराण्यावर असीम निष्ठा असणारे राजघराण्याच्या वतीने सर्व सामान्यांचे प्रश्‍न अहोरात्र सोडविणार्‍या आपल्या वाणीने व कर्तुत्वाने युवकांच्या मनावर अधिराज्य करणार्‍या भरतगांववाडी येथीलसुनिल काटकर यांना गौरवविण्यात आले. शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख 11111/- रू असे या पुरस्काराचे स्वरूप होते. चालू वर्ष 2018-19 पासून आपल्या परिसरातील ज्येष्ठ स्वा.सै.कै.बाबुराव जंगम (गुरूजी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केलेल्या तसेच संस्थेची कर्मभूमी असणार्‍या मौजे कोडोली ता. जि. सातारा या गावच्या पंचक्रोशीतील वैशिष्टयपूर्ण कार्य करून गावचे नांव उज्वल करणार्‍या कोडोली भागातील व्यक्तीस दिला जाणारा कोडोली भूषण पुरस्कार, कोडोली गांवचे ज्येष्ठ नेते व गेली 25 वर्षे आपल्या समाजकारणाने कोडोली आणि परिसराचा चौफेर विकास करणार्‍याबाळासाहेब काटे यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रू 5001/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते.संस्थेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणार्‍या व्यक्तीस दिल्या जाणारा शिवकला गौरव पुरस्कार आपल्या कार्याने, धडपडीने आपले गांव पाणीदार करणार्‍या व पाणी फौडेशनच्या माध्यमातून गावाचा कायापालट करणार्‍या श्री सुभाष कदम जायगांव तसेच आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सत्तेच्या बाहेर राहून आपल्या गावातील तरूणांना मार्गदर्शन करून गावचा चौफेर शैक्षणिक, सामाजिक विकास करणार्‍या कुसवडे ता. जि. सातारा येथील विठठ्ल सराटे यांना तसेच चिखली ता. जि. सातारा सारख्या डोंगरी, दुर्गम भागामध्ये सामाजिक कार्य करणार्‍या आपली नोकरी मुंबईसारख्या शहरात करत असूनही सतत गावच्या प्रगतीचा ध्यास घेतलेल्या श्री महादेव काकडे यांना विभागून देण्यात आला. शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रू 5001/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थांतर्गत उत्कृष्ठ कार्याबदद्ल दिला जाणारा शिवकला आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेच्या लोकमान्य विद्यामंदिर, माने कॉलनी, देगांवरोड, एम. आय. डी. सी. सातारा. शाळेतील उपशिक्षक श्री प्रदिप चपटे यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रू 10001/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते.संस्थेच्या स्फुर्तीस्थान कै.सौ.कलावती माने यांच्या पुण्यस्मृतीदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या शिवकला चषक जिल्हास्तरीय भजनी मंडळ स्पर्धा सन 2018-19 या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते घेण्यात आला. यामध्ये सुरश्री महिला भजनी मंडळ, कोयना वसाहत यांना प्रथम, स्वरसंगम भजनी मंडळ, बेलदरे यांना व्दितीय, श्रीदत्तकृपा भजनी मंडळ, काशिळ यांना तृतीय, स्वरगंधा भजनी मंडळ, सासपडे यांना चतुर्थ, जोर्तिलिंग भजनी मंडळ, खोडद यांनी पंचम क्रमांक मिळविल्याबदद्ल तसेच संतगोरोबाकाका भजनी मंडळ वर्णे, नारायण भजनी मंडळ संगमनगर, शारदा गणेश भजनी मंडळ शनिवारपेठ, गजानन भजनी मंडळ न्यूविकासनगर, ज्ञानाई भजनी मंडळ शिरंबे, माहेश्‍वरी भजनी मंडळ खणआळी सातारा आदी मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीसे देवून गौरविण्यात आले.संस्थेचे हितचिंतक अ‍ॅड श्री नितीन शिंगटे यांची भारत सरकारकडून नोटरी पदी, श्री विशाल माने यांची स्पर्धा परीक्षेमधून कु. वैदेही शिंदे हीने इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविल्याबदद्ल, लोकमान्य हायस्कूल साताराचा चि सुधांशू जावळे याने विभागीय शालेय कुडो स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबदद्ल, चि चेतन देशमुख याने आंतर शालेय तालूका स्तर कराटे स्पर्धेमध्ये उज्वल यश मिळविल्याबदद्ल मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.जायंटस ग्रुप सातारा यांनी संस्थेच्या दुर्गम, डोंगरी, ग्रामीण भागातील चिखली, जायगांव या शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकली दिल्याबदद्ल तसेच इंद्राणी बालन फौडेशन पुणे यांनी संस्थेच्या सर्व शाळांसाठी वाचनीय पुस्तके मिळवून दिल्याबदद्ल संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवराम माने (गुरूजी) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्था वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भित्तीचित्र, चित्रकला स्पर्धा तसेच संस्थेच्या सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेचे मार्गदर्शकखा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या व्यस्त कार्यबाहूल्यामुळे उपस्थित राहून संस्थापक अध्यक्ष दलितमित्र  शिवराम माने (गुरूजी) यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माने गुरूजी यांच्या कार्याबदद्ल गौरवोद्गार काढले व श्री माने गुरूजी यांच्यासारख्या व्यक्तींना शतायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली. याप्रसंगी बोलतानाआनंदराव पाटील म्हणाले, अगदी सुरूवातीपासून मी या संस्थेचे कार्य जवळून पाहिले आहे. श्री माने गुरूजी व त्यांचे चिरंजीव श्री सुनिल माने यांनी शून्यातून विश्‍व निर्माण करत असताना छोटयाशा रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर केलेले मी पाहिले आहे. संस्था सुरू करणे, चालविणे, वाढविणे आणि नावारूपाला आणणे यामध्ये या माने पितापुत्रांचा सिंहाचा वाटा आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रचंड धडपड, त्याग करून संस्थेने मिळविलेला नावलौकीक खरोखरच कौतुकास पात्र आहे.फफकार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ जोती जाधव, दै.ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव, क्रांतीसिंह नाना पाटील यांचे पणतू सागर पाटील, नगरसेवक किशोर शिंदे, माजी नगरसेवक वसंतशेठ जोशी, बाळासाहेब ढेकणे, मा.पं.स. सदस्य  बच्चाराम यादव, कॉग्रेसचे संघटक सोपानराव जाधव, कराड उत्तर कॉग्रेसचे अध्यक्ष हेमंतराव जाधव, अमोलभाऊ तांगडे, श्री बाळासाहेब खरात, जायंटस ग्रुपचे मनोज देशमूख, शिवाजी शिवणकर, रविंद्र भोसले,  बळवंत फडतरे, विजय घाडगे, कुसवडे गावच्या सरपंच सौ नुतन खामकर, चिखली गांवच्या सरपंच सौ सोनाबाई झुंजार, माजी सरपंच श्री सुरेश शिर्के, जायगांव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ प्रियांका कदम, श्रीमती इंदुताई जोशी, कोडोली, कुसवडे, जायगांव, गारवडी, संभाजीनगर, समर्थनगर, एम.आय.डी.सी. परिसरातील गांवचे पदाधिकारी व ग्रामस्थ, संस्थेचे संचालक, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सर्व पदाधिकारी, संस्थेच्या सर्व शाखांमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री दत्तात्रय काळे यांनी, सुत्रसंचालन कु. प्रतिभा जाधव, आभार श्री विजय सदावर्ते यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular