महाबळेश्वर : पहील्या श्रावणी सोमवार निमित्त दक्षिण काशी म्हणुन प्रसिध्द असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर येथील श्री महाबळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये याची खबरदारी श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानने घेतली होती
श्रावण महीना हा हिंदु धर्मात पवित्र मानला जातो श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे श्री महाबळेश्वराचे हेमाडपंथी मंदीर असुन तेथे स्वयंभु शिवलिंग आहे हे शिवलिंग रूद्राक्षाच्या रूपात असुन श्रावणात श्री महाबळेश्वराच्या दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी आज भल्या पहाटे अभिषेक झाल्या नंतर दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले महाराष्ट् आंध्र गुजरात व कर्नाटक या राज्यातुन येथे मोठया संख्येने भाविक येतात येथे पाच नदयांचे उगम स्थान असुन या उगम स्थानावर असलेल्या कुंडात आंघोळ करून दर्शन घेण्याचा प्रघात आहे त्या मुळे सकाळी या कुुंडात आंघोळी साठीही गर्दी झाली होती भाविकांच्या हाताचा स्पर्श होवुन शिवलिंगाची झीज होत असल्याने देवस्थान ट्स्टच्या वतीने त्यावर पारदर्शक काचेचे आवरण बसविण्यात आले आहे दर्शन झाल्या नंतर येथे ट्स्टच्या वतीने प्रसादाची सोय करण्यात आली आहे आज येथे मुसळधार पाउस कोसळत असतानाही भाविकांचा उत्साह कणभरही कमी झाला नाही तरी देखील पावसा पासुन भाविकांचे संरक्षण करण्यासाठी मंदीर परीसरात छत उभारण्यात आले आहे तसेच वाहनांच्या सोईसाठी वाहनतळ सज्ज ठेवण्यात आला आहे महाबळेश्वर येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व वन व्यवस्थापन समितीही भाविकांची गैरसोय होवु नये या साठी खबरदारी घेत आहे