Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीश्री मळाईदेवी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभाचे आयोजन

श्री मळाईदेवी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभाचे आयोजन

तळमावलेः पाटण तालुक्यातील चोरगेवाडी (काळगांव) येथे श्री मळाईदेवी मंदिराच्या जीर्णोध्दारानिमित्त मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभानिमित्त शुक्रवार दि.10 मे, 2019 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. शुक्रवार दि.10 मे, 2019 रोजी पहाटे 4 ते 10 पर्यंत होमहवन व मुर्ती अभिषेक, सकाळी 10 ते 10.30 पर्यंत ह.भ.प. रमेश महाराज काजारी यांचे हस्ते मुर्तीप्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन, सकाळी 11.30 वाजता महाआरती, दुपारी 1 ते 8 वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी 2 ते 4 महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी 5 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते मंदिर उद्घाटन समारंभ तर रात्री 9 वाजता ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (देवाची आळंदी) यांचे कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
याशिवाय सामुदायिक अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी 18 व्या अध्याचे पारायण शनिवार दि.11 मे ते मंगळवार दि.14 मे अखेर होणार आहे. या कालावधीत दररोज सकाळी 4 ते 6 काकड आरती, 8 ते 11 व दुपारी 2 ते 4 पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी वाचन, सायं.6 ते 8 हरिपाठ, रात्री 7 ते 8 संतपंगत आणि रात्री 9 ते 11 कीर्तनाचे आयोजन केले आहे.
शनिवार दि.11 मे रोजी ह.भ.प. पांडूरंग महाराज आस्कट यांचे प्रवचन, ह.भ.प. वासुदेव महाराज स्वामी यांचे कीर्तन, रविवार दि.12 मे रोजी ह.भ.प. रामचंद्र महाराज चोरगे यांचे प्रवचन आणि ह.भ.प. शिवाजी महाराज मत्रे यांचे कीर्तन, सोमवार दि.13 मे रोजी सायंकाळी 4 वाजता ज्ञानेश्‍वरी पारायण दिंडी सोहळा आणि रात्री 9 वाजता ह.भ.प. बाबुराव महाराज भोसले यांचे कीर्तन होईल. याचदिवशी श्री भैरवनाथ निनाईदेवी प्रासादिक भजनी मंडळ आणि श्री मळाईदेवी भजनी मंडळ चोरगेवाडी यांचा जागराचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि.14 मे, 2019 रोजी सकाळी 9 वाजता ह.भ.प.चंद्रकांत महाराज मस्कर यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन श्री मळाईदेवी सार्वजनिक उत्सव मंडळ, ग्रामस्थ मंडळ चोरगेवाडी तसेच शंकर चोरगे, शंकर डाकवे, अशोक चोरगे आणि मंडळाचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular