Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीश्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

साताराः येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील श्री उमादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीने दिली आहे.
येत्या गुरूवार दि.11 ऑक्टोंबरपासून या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होवून यामध्ये 11 ऑक्टोंबरला गुरूवारी सकाळी 8 ते 10 यावेळेत श्री दुर्गासप्तशती पारायण सुरू होणार असून हे पारायण दररोज पुढील गुरूवारपर्यत होणार आहे. सकाळी 10 ते 11 यावेळेत उमादेवीस ललिता सहस्त्रनाम अर्चना व आरती तसेच सुवासिनी व कुमारिका पुजा होणार आहे. सायं. 5 वा. श्री शिवकामसुंदरी देवीस ललिता सहस्त्रनाम अर्चना होणार आहे. वरील सर्व कार्यक्रम पुढील गुरूवार दि. 18 ऑक्टो. दरम्यान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
शनिवार दि. 13 रोजी सायं.6 वा. वेदमुर्ती दत्ताशास्त्री जोशी यांचेकडून सौदर्यलहरी पारायण, सोमवार दि. 15 रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत चंडीहोम व प्रवचन,विष्णूसहस्त्रनाम व भागवत निरूपण दिपा फाउंडेशनचे दिलीप वासुदेव आपटे करणार आहेत. सकाळी 10 ते 11 यावेळेत कन्यापुजा व दुपारी 1 ते सायं.8 महाप्रसाद वितरण होणार आहे. बुधवार दि.18 रोजी सायं. 6 वा महिलांकडून मंदिरात दीपपुजा केली जाणार आहे.
नवरात्रोत्सव काळात उमादेवीस रोज विविध अलंकार पुजा होवून रविवार दि.14 ऑक्टोंबर रोजी विविध भाज्यांची शाकंभरी पुजा करण्यात येणार आहे. मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून यामध्ये गुरूवार दि.11 ऑक्टोंबर रोजी नृत्यज्योती कथ्थक विद्यालयाच्या सतीश सातारकर व वैजयंती चौकवाले समुहाचे कथ्थक नृत्य सादर होणार आहे. शुक्रवार दि.12 रोजी फलटण येथील सौ. हर्षदा गुजर-भिलारे नृत्यकलामंदिरत संस्था व समुहाचे भरतनाटयम. रविवार दि.14 रोजी सायं. 6 वा. सौ. आंचल घोरपडे यांच्या नटराज नृत्य कलाशाळेचे भरतनाटयम, मंगळवार दि. 16 रोजी सायं.6 वा. गुरू सौ.स्नेहा घाडगे यांच्या नादब्रम्ह या नृत्यसंस्थेचे भरतनाटयम, सायं. 7 वा. केएसडी शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून गुजराथी गरबा व जागर गोंधळाचा कार्यक्रम आणि गुरूवार दि .18 रोजी सायं.6 वा. गुरूसुधांशू किरकिरे त्यांच्या नृत्यसाधना संस्थेचे भरतनाटयम संपन्न होणार आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाचा सर्व सातारकरांनी देवी अभिषेक, ललिता सहस्त्रनाम अर्चना, पुर्ष्पाचना, कन्यापुजा, उमादेवीस अलंकार पुजा, एकदिवसीय सुहासिनी पुजा, ललिता पंचमी,  सौदर्य लहरी पुजा, श्री दुर्गासप्तशती पारायण, चंडीहोम व महाप्रसाद या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने उपस्थित राहून तन मन धन द्वारे सहयोग दयावा आवाहन मंदिर समितीने केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular